मालदीवच्या ट्रिपनंतर फराह खान कुक दिलीपसोबत नुकतीच न्यूझीलंडला पोहोचली होती. तिथून फराहने एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यातून दिलीपने तिथे दुसऱ्या कोणाशीतरी लग्न केले हे उघड झाले आहे. दिलीपने हे लग्न नवीन मॅनेजर किमशी केले, जी त्यांना न्यूझीलंडमध्ये भेटली. खरंतर हे सर्व गंमत-जंमत म्हणून घडले. न्यूझीलंडमधील काही ठिकाणी फिरल्यानंतर फराह, त्याची मॅनेजर किम आणि कुक दिलीप ऑकलंडमधील एका फार्महाऊसवर पोहोचले. तेथील शेफने तिघांसाठी फार्ममधून फ्रेश भाज्या तोडून स्वयंपाक करायला सुरुवात केली. तेव्हा काहीतरी असे घडले की, दिलीपचे फराहच्या मॅनेजरसोबत लग्न झाले, तर त्यांचे बिहारमध्ये पत्नी आणि तीन मुले आहेत.
दिलीप आणि किम यांच्यात गमतीने लग्नाची चर्चा सुरू झाली. फराह खानने या मजेत भर घातली आणि दिलीपला चिडवले. फराहच्या सांगण्यावरून दिलीप यांनी फायरवुडच्या लाकडांना साक्षी मानून किमसोबत फेरे घेतले, जणू ते लग्नच करत आहेत. हे पाहून फराहने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाली की, आता तुमच्या दोघांचं लग्न झाले.
फराहने उडवली खिल्लीयानंतर किम दिलीप यांच्याकडे पाहून हसू लागली. मग फराह खान किमला म्हणाली की, "आता तू भारतात ये, कारण तू आता भारतीय वधू बनली आहेस." हे ऐकून किम म्हणते की, ती एका भारतीय स्टारशी लग्न करून खूश आहेत. हे ऐकून फराहलाही आश्चर्य वाटले आणि ती लगेच म्हणाली, "नाही, हा आधीच विवाहित आहे आणि त्याला तीन मुले आहेत." त्यानंतर फराह दिलीपला चिडवत म्हणाली, "तुझी बायको सगळं पाहत आहे. तू न्यूझीलंडमध्ये एका विदेशीसोबत लग्न केले आहेस." यानंतर जेव्हा ती दिलीपला अभिनंदन करण्यासाठी हात पुढे करते, तेव्हा त्याला धक्का बसतो आणि तो 'नाही' म्हणतो.
यानंतर किम आणि दिलीप कॅमेऱ्यासमोर एकमेकांना जेवण भरवत होते, ज्यावर फराह म्हणाली, "राजा बाबूला बघा." नंतर दिलीप आणि किमने बंजी जंपिंग केले. दिलीपने उडी मारण्यापूर्वी, फराहने त्याला पुन्हा चिडवले आणि विचारले, "तुला तुझ्या बायकोला काही सांगायचे आहे का? तुला तिला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायला सांगायचे आहे का?" यावर दिलीप हसून उत्तर देतो, "नक्कीच, बाय बाय."
दिलीपने तिथून काढला पळयानंतर फराह सांगते की, त्यांची न्यूझीलंडची ट्रिप संपली आहे. किम दिलीपला म्हणते की, ती त्याला खूप मिस करेल. त्यानंतर ती दिलीपला पिवळ्या रंगाचे गुलाब देते. दिलीप गोंधळून जातो आणि गुलाब पाहून फराहला विचारतो, "ही काय म्हणत आहे?" फराह गंमत करत म्हणाली, "किम म्हणत आहे की, आता तुला तिच्यासोबत इथेच राहावे लागेल, कारण आता तुम्ही दोघे विवाहित आहात." हे ऐकताच दिलीप किमचे आभार मानतो आणि तिथून पळ काढतो.
Web Summary : Farah Khan's cook, Dilip, jokingly 'married' his manager Kim in New Zealand. The incident occurred during a trip, with Farah teasing Dilip about his 'new wife', despite him already having a wife and children in India. The trip ended with playful chaos.
Web Summary : फराह खान के कुक, दिलीप ने न्यूजीलैंड में मजाक में अपनी मैनेजर किम से 'शादी' कर ली। यह घटना एक यात्रा के दौरान हुई, जिसमें फराह ने दिलीप को उसकी 'नई पत्नी' के बारे में छेड़ा, जबकि दिलीप पहले से ही भारत में एक पत्नी और बच्चों वाला है। यात्रा हंसी-मजाक के साथ समाप्त हुई।