Farah khan : बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या एका खास कारणाने चर्चेत आहे. फराहच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे तिच्या तिन्ही मुलांचा आज १८ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने फराहने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.
फराह खानला अन्या, दिवा आणि जार असे तिळं (Triplets) आहेत. मुलांच्या १८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून फराहने त्यांच्या लहानपणापासूनचे आतापर्यंतचे काही खास फोटो आणि आठवणींचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना फराहने कॅप्शनमध्ये लिहिले, "वेळ कसा निघून गेला हे समजलंच नाही आणि आज मुलं १८ वर्षांची झाली. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या आठवणी आणि चांगले शिक्षण या दोनच सर्वोत्तम गोष्टी देऊ शकता. तुमची आई असल्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे".फराहने शेअर केलेल्या या व्हिडीओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
फराह खान चाळिशी उलटल्यावर झाली तिळ्यांची आईफराह खान आणि शिरीष कुंदर यांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. शिरीष आणि फराहच्या वयात ९ वर्षांचं अंतर आहे. त्याचा धर्मही वेगळा आहे. होय, शिरीष हिंदू आहे आणि फराह मुस्लिम आहे. दोघांनीही धर्म आणि वयाची पर्वा न करता लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर, ११ फेब्रुवारी २००८ रोजी सरोगसीद्वारे फराह आणि शिरीष तीन मुलांचे पालक झाले. आज तिची मुले १८ वर्षांची झाली आहेत.
फराह खान हल्ली सोशल मीडियावर आणि विशेषतः तिच्या यूट्यूब चॅनेलवर खूप सक्रिय असते. तिच्या यूट्यूब चॅनेलचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. ती अनेकदा सेलिब्रिटींच्या किचनमध्ये जाऊन नवनवीन पदार्थ बनवते. केवळ सिनेविश्वातीलच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या घरी जाऊनही तिने व्हिडीओ शूट केले आहेत. तिच्या या हटके कंटेंटमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मुलांच्या शिक्षणाचा बराचसा खर्च फराह तिच्या यूट्यूब चॅनेलच्या कमाईतून करते, असे तिने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते.
Web Summary : Farah Khan celebrates her triplets' 18th birthday with a heartfelt video. She expresses immense pride and joy in being their mother, sharing cherished memories. Farah married Shirish Kunder in 2004 and had triplets through surrogacy in 2008.
Web Summary : फराह खान ने अपने तीन बच्चों का 18वां जन्मदिन एक भावपूर्ण वीडियो के साथ मनाया। उन्होंने उनकी माँ होने पर अपार गर्व और खुशी व्यक्त की, और यादगार पलों को साझा किया। फराह ने 2004 में शिरीष कुंदर से शादी की और 2008 में सरोगेसी के माध्यम से तीन बच्चे हुए।