Join us

फराह खानने कूक दिलीपच्या मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:12 IST

फराहच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

कोरिओग्राफर, दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. 'मै हू ना', 'हॅपी न्यू इयर' यांसारख्या सिनेमांचं तिने दिग्दर्शन केलं आहे. तर हिंदी सिनेमातील अनेक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. फराह खान सध्या तिच्या युट्यूब चॅनलवरुन तिचा स्वयंपाकी दिलीपसह सर्वांना भेटत असते. तिचा स्वयंपाकी  दिलीप घराघरात पोहोचला आहे.  त्याला चांगली लोकप्रियता मिळत आहे. अशातच फराह खान दिलीपच्या मुलांसाठी मोठा निर्णय घेतलाय. फराहने तिच्या कुकिंग व्लॉगमध्ये याबद्दल माहिती दिली. तिच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. 

अलिकडेच फराह ही अभिनेता शालिन भनोटच्या घरी पोहोचली. यावेळी तिच्या स्वयंपाकी दिलीपच्या मुलांना त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिल्याचं तिनं सांगितलं. एवढेच नाही तर तिने दिलीपच्या एका मुलाला स्वयंपाकाच्या व्यावसायिक डिप्लोमामध्ये प्रवेश दिलाय. जेणेकरून तो चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करू शकेल आणि त्याला कोणाच्या घरी स्वयंपाक करण्याची सक्ती केली जाणार नाही.

फराह खान आणि दिलीप यांच्या कुकिंग व्लॉगमध्ये आतापर्यंत काजोल, रवीना टंडन, सोनाली बेंद्रे, अदिती राव हैदरी, कबीर खान, विजय वर्मा आणि मलायका अरोरा सारखे प्रसिद्ध स्टार दिसले आहेत.  फराह खान आणि दिलीप यांच्यातील खास बॉण्डिंग उपस्थित कलाकारांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस पडते. दिलीप उत्तम कुक असून तो नेहमीच त्याच्या हातच्या चवीने साऱ्यांचं मन जिंकतो. 

टॅग्स :फराह खानयु ट्यूब