Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखसोबत पुन्हा काम करणार? 'मै हूँ ना'च्या सीक्वलबाबत रंगणाऱ्या चर्चांवर फराहने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:09 IST

'मै हूँ ना २' खरंच येणार?

शाहरुख खान आणि फराह खान यांची जोडी पुन्हा एकदा 'मै हूँ ना २' साठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. 'मै हूँ ना' हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. या री-रिलीजला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि हाऊसफुल्ल शोजमुळे या चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या. २०१४ च्या 'हॅप्पी न्यू इयर'नंतर शाहरुख-फराह ही सुपरहिट जोडी पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाली असून चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होत असल्याचे दावे अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आले होते. आता फराह खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

एका मुलाखतीत फराह खानने स्पष्ट केलं. "मै हूँ ना २' बाबत सध्या कोणताही अधिकृत प्लॅन किंवा स्क्रिप्टिंग सुरू नाही. अशा अफवांवर प्रेक्षकांनी विश्वास ठेवू नये. रि रिलीजच्या यशामुळे प्रेक्षक उत्साहित आहेत हे स्वाभाविक आहे. मात्रया चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरू नसल्याचे तिने स्पष्ट केल्यामुळे चाहत्यांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.

दुसरीकडे, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' या मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची विशेष चर्चा यासाठी आहे कारण शाहरुख यात पहिल्यांदाच आपली मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना आणि शाहरुखसोबतच अभिषेक बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' यांसारखे सलग तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, आता शाहरुखच्या 'किंग' या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर फराह खान तिच्या युटू्यूब चॅनल्समुळे चर्चेत असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farah Khan Denies 'Main Hoon Na 2', Focuses on Other Projects

Web Summary : Farah Khan clarifies that there are no current plans for 'Main Hoon Na 2'. She's focusing on other projects while Shah Rukh Khan is busy with 'King' alongside Suhana Khan.
टॅग्स :फराह खानशाहरुख खानबॉलिवूड