बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री फराह खान(Farah Khan)च्या अडचणीत वाढ झाली आहे. होळी सणाला छपरींचा सण म्हणणं तिच्या अंगाशी आलं आहे. तिच्या विरोधात पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठक(Hindusthani Bhau Aka Vikas Pathak)ने त्याचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे.
२० फेब्रुवारी रोजी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या टेलिव्हिजन शोच्या एका भागादरम्यान फराह खानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी करत शुक्रवारी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. विकास पाठकने तक्रारीत दावा केला आहे की फराहने होळीचे वर्णन 'छपरींचा सण' असे केले आहे आणि अपमानास्पद असा शब्द वापरला आहे. फराह खानच्या कॉमेंटमुळे त्यांच्या वैयक्तिक धार्मिक भावना आणि मोठ्या हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.
हिंदुस्थानी भाऊने केली तक्रार दाखल
वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले, 'फराह खानच्या या टिप्पणीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे माझ्या अशिलाचे म्हणणे आहे. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी हा शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.' तक्रारीत असे लिहिले की, 'माझ्या क्लायंटने म्हटले आहे की आरोपीने केवळ माझ्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात हिंदू समुदायाला त्रास दिला आहे. या घटनेत फराह खानचा सहभाग आहे. बॉलिवूडची एक आघाडीचे चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक, ज्यांनी अलीकडेच हिंदू सण होळीबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मी या तक्रारीद्वारे न्याय मागतो.
फराह खानवर गुन्हा दाखलफराह खानवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ जज फराह खानने होळीच्या सणाबद्दल भाष्य केले. या कमेंटमुळे त्याला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.