Join us

'शिकारा' फेम आदिल खानचा जिम लूक पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 17:46 IST

आदिल खानने शिकारा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित शिकारा चित्रपट यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारीत होता. या चित्रपटात आदिल खान आणि सादिया खतीब हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटातील आदिल आणि सादियाचे काम सर्वांना खूप भावले होते. त्यानंतर आता आदिल खानने त्याच्या पिळदार शरीरयष्टीने चाहत्यांना थक्क केले आहे.

रेडिओ जॉकी राहिलेला आदिल खानने शिकारा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आदिल खानला, विधू विनोद चोप्राने चित्रपटात ऑफर देण्याआधी तो आरजे म्हणून काम करत होतो. तो देशातील टॉप ५मधील प्रसिद्ध आरजे आहे. तो नसरच्या नावाने प्रसिद्ध आहे.

आदिल शिकारा चित्रपटात काश्मिरी पंडिताच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. लवकरच आदिल खान आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. 

आदिल खानने चित्रपटाशिवाय आपल्या पिळदार शरीरयष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो जिम लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.  आदिल खानला गेमिंग आणि पेंटिंगची खूप आवड आहे. त्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

शिकाराची कथा १९९० साली जेव्हा काश्मीरमधून एक समुदायला बेघर करण्यात आले होते. ३०वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा अजून ते आपल्या घरी परतले नाहीत. त्यांची व्यथा या सिनेमातून मांडण्यात आली. विधु विनोद चोप्रा यांची शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित' ७ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता.

टॅग्स :शिकारा