Join us

Viral Memes : सोशल मीडियावर कार्तिक आर्यनच्या मिशीची थट्टा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 11:03 IST

लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. कालच या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी करण्यात आला. पण कार्तिकने जसा हा फोटो शेअर केला, तसे त्याच्या या लूकवर मजेशीर मीम्स बनने सुरु झाले

ठळक मुद्दे. १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाल्या झाल्या कार्तिककडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या आॅफर्स येत आहेत. लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या स्टारडमची मजा अनुभवतोय. ‘प्यार का पंचनामा’ ते ‘सोनू के टीटू की स्वीटी’पर्यंतचा कार्तिकचा प्रवास सहज सोपा नव्हता. पण शेवटी त्याने यशाचे शिखर गाठलेच गाठलेच. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या कार्तिकच्या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला. १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाल्या झाल्या कार्तिककडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या आॅफर्स येत आहेत. लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट भूमी पेडणेकर  आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 'पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे.

कालच या चित्रपटाचा  फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या लूकमध्ये कार्तिक चेक्सचा शर्ट, मिशी अशा आगळ्या वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतोय. पण कार्तिकने जसा हा फोटो शेअर केला, तसे त्याच्या या लूकवर मजेशीर  मीम्स बनणे सुरु झाले. सोशल मीडियावरचे कार्तिकच्या मीशीवरचे हे मीम्स इतके भन्नाट आहेत की, तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत... पाहा तर...

 

टॅग्स :कार्तिक आर्यन