Join us

आजोबांच्या कुशीत दिसली आलिया-रणबीरची लेक! ऋषी कपूर आणि राहाचा व्हायरल फोटो पाहून नीतू कपूरही भारावल्या, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 15:55 IST

ऋषी कपूर आणि राहा यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. लग्नानंतर काही महिन्यातच आलिया-रणबीर आईबाबा झाले. त्यांना राहा ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर-आलियाने लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला होता. कपूर कुटुंबाच्या लाडक्या परीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता राहाचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती ऋषी कपूर यांच्याबरोबर दिसत आहे. 

ऋषी कपूर आणि राहा यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आजोबा-नातीचा हा फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एका चाहत्याने त्यांचा हा फोटो एडिट केला आहे. ऋषी कपूर यांच्या कुशीत राहाला पाहून नीतू कपूर आणि आलियाची आई सोनी राजदानही अवाक् झाल्या आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. "हे खूप छान आहे", असं त्यांनी स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

आलिया आणि रणबीरने २०२२मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर काहीच महिन्यात ते आईबाबा झाले. राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीरने लेकीसाठी थोडा वेळ कामातून ब्रेकही घेतला होता. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटऋषी कपूरनितू सिंग