Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर निर्मल जानी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:39 IST

बाॅलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर निर्मल जानी यांचे शनिवारी सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

बाॅलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर निर्मल जानी यांचे शनिवारी सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निर्मल जानी सिनेमेटोग्राफी करत असलेली स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय आहे. निर्मल जानी ह्यांनी पत्थर के फूल या 1991 मध्ये आलेल्या सिनेमापासून आपल्या सिनेमेटोग्राफी कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बाॅर्डर,दुश्मन,प्यार तो होना ही था ,जख्म,हद कर दी आपने , राजू चाचा, हॅटट्रीक, रक्त,ब्लॅकमेल अश्या हिट सिनेमांची सिनेमेटोग्राफी केली. भारतीय टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक गाजलेल्या शक्तिमान या सिरियलची सिनेमेटोग्राफीही निर्मल जानी ह्यांचीच होती.