Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ प्रसिद्ध कोरिओग्राफरची पत्नी आहे सुंदर; या चित्रपटात झळकली होती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 21:19 IST

बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्री आणि अभिनेत्यांशी संबंधित कॉन्ट्रोव्हर्शी आणि त्यांच्या अफेयरशी संबंधित चर्चा रंगत असते. मात्र चित्रपटांच्या निर्मितीमध्ये कोरिओग्राफरचीही तेवढीच ...

बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्री आणि अभिनेत्यांशी संबंधित कॉन्ट्रोव्हर्शी आणि त्यांच्या अफेयरशी संबंधित चर्चा रंगत असते. मात्र चित्रपटांच्या निर्मितीमध्ये कोरिओग्राफरचीही तेवढीच मोलाची भूमिका असते. कारण यांच्याच इशाºयावर अभिनेत्री व अभिनेत्यांना नाचावे लागते. आज आम्ही अशाच एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि त्याच्या सुंदर पत्नीविषयी सांगणार आहोत. कोरिओग्राफर गणेश आचार्यचा जन्म १४ जून १९७१ रोजी झाला. त्याने अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केले. सध्या फिल्म इंडस्ट्रीत गणेश आचार्य हे अतिशय लोकप्रिय असे नाव आहे. गेल्या २० वर्षांपासून गणेश मोठमोठ्या कलाकारांना आपल्या इशाºयावर नाचवत आला आहे. काही काळापूर्वी गणेशचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये त्याचा लूक सुखद धक्का देणारा होता. कारण या लूकमध्ये गणेशने तब्बल ८५ किलो वजन कमी केल्याचे दिसत होते. असो, गणेशच्या पत्नीविषयी सांगायचे झाल्यास तिचे नाव विधी आचार्य असून, ती खूपच सुंदर आहे. विधी ‘हे ब्रो’ या चित्रपटातही बघावयास मिळाली आहे. या चित्रपटालादेखील गणेशनेच कोरिओग्राफ केले होते. विधीने इंडस्ट्रीत ‘हे ब्रो’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले. या चित्रपटात गणेश आचार्य मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर इंडस्ट्रितील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी त्यामध्ये कॅमिओही केला होता. हा चित्रपट दोन हरवलेल्या भावांवर आधारित होता. विधी नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. त्याचबरोबर बॉलिवूडमधील कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असते.