Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘द फॅमिली मॅन 2’च्या कलाकारांनी किती घेतली फी? मनोज वाजपेयीच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:00 IST

The Family Man 2 :‘द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयीने सर्वाधिक फी घेतली. या वेबसीरिजमध्ये मनोजने श्रीकांतची भूमिका साकारली आहे.

ठळक मुद्देसाऊथ सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीने या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर हिंदीमध्ये डेब्यू केला आहे.

सोशल मीडियावर सध्या काय तर ‘द फॅमिली मॅन 2’चीच ( The Family Man 2) चर्चा आहे. मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee), सामंथा अक्कीनेनी, प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबसीरिजने चाहत्यांना वेड लावले आहे. सीरिजमधील सर्व कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाचेही जोरदार कौतुक होतेय. सामंथा अक्कीनेनी हिने साकारलेल्या ‘राजी’ या भूमिकेवर तर चाहते अक्षरश: फिदा आहेत. तूर्तास आम्ही या वेबसीरिजच्या कलाकारांनी या सीरिजसाठी घेतलेल्या फीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  अर्थात प्रॉडक्शन हाऊस व संकलाकारांनी मानधनाच्या आकड्यांबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. पण या आकड्यांची बी टाऊनमध्ये सध्या जबरदस्त चर्चा आहे.

नेटवर्क 18 ने सीरिजच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयीने सर्वाधिक फी घेतली. होय, या वेबसीरिजमध्ये मनोजने श्रीकांतची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 10 कोटी रूपये घेतले. 

साऊथ सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीने (Samantha Akkineni )या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर हिंदीमध्ये डेब्यू केला आहे. या भूमिकेसाठी सामंथाने 3 ते 4 कोटी रूपये फी घेतल्याचे कळते.

सुचित्रा अर्थात श्रीकांतची पत्नी सुचित्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्र्रियामणिने या सीरिजसाठी 80 लाख रूपये चार्ज केल्याचे कळते.

‘द फॅमिली मॅन 2’मध्ये जेकेची भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाशमी यानेही प्रियामणीच्या खालोखाल 65 लाख रूपये फी घेतली आहे.

सीरिजमध्ये मेजर समीरची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमारने ‘द फॅमिली मॅन 2’साठी 1 कोटी रूपये फी घेतल्याची चर्चा आहे.

मराठमोळा अभिनेता शरद केळकर याचीही ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अरविंदची भूमिका त्याने साकारली आहे. यासाठी त्याने 1.6 कोटी रूपये फी घेतल्याचे कळतेय.

अन्य स्टारकास्टच्या फीबद्दल सांगायचे तर सनी हिंदुजाने आपल्या भूमिकेसाठी 60 लाख रूपये फी घेतली तर श्रीकांत तिवारीच्या मुलीची भूमिका साकारणारी अश्लेषा ठाकूर हिनेही 50 लाख रूपये घेतल्याचे समजतेय.

टॅग्स :मनोज वाजपेयीसमांथा अक्कीनेनीवेबसीरिज