Join us

सैफिनाच्या बाळासाठी कुटुंबीय उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 17:59 IST

खान कुटुंबियांमध्ये चिमुकल्या बाळाचे आगमन होणार असून त्याचीच प्रतीक्षा करणे सध्या सुरू आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर ...

खान कुटुंबियांमध्ये चिमुकल्या बाळाचे आगमन होणार असून त्याचीच प्रतीक्षा करणे सध्या सुरू आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचे बाळ डिसेंबरमध्ये जन्म घेणार आहे.बाळाची होणारी आत्या म्हणजेच सोहा अली खान म्हणते,‘घरामध्ये बाळाविषयी खुपच उत्सुकता आहे. करिना आणि सैफ हे कपल सर्वांचेच आवडीचे कपल आहे. त्यामुळे बाळ केव्हा येणार? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.याबद्दल करीना म्हणते,‘काही जण मला विचारत आहेत की, मला मुलगा हवा की मुलगी ? पण यात मी काय करू शकते. लोकांनी तरी असे प्रश्न कशाला विचारावेत? कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते ती देखील लोकांनी ओलांडू नये.’