Join us

Fake Report! अमिताभ बच्चन म्हणाले - 'चुकीचे, बेजबाबदार, बनावट आणि धादांत खोटे!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:45 IST

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसशी सामना करत आहेत. दरम्यान ते बरे झाल्याचे बोलले जात होते. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करत या अफवांना पूर्णविराम लावला आहे.

अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसशी सामना करत आहेत. दरम्यान त्यांच्याबद्दल अफवा पसरली होती की ते बरे झाले आहेत. असेही बोलले जात आहे की त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करत अफवांना पूर्णविराम लावला आहे.

अमिताभ बच्चन सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. अशी अफवा पसरली होती की कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता बिग बी 2-3 दिवसांत घरी परतणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिले की, हे वृत्त चुकीचे, बेजबाबदार, बनावट आणि गंभीर खोटे आहे.

11 जुलैला उशीरा रात्री अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी अभिषेक बच्चनला थोडा ताप होता आणि अमिताभ बच्चन यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. दोघांनी कोरोनाची टेस्ट केली होती आणि त्यात दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

 या दोघांनंतर 12 जुलैला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व आराध्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. काही दिवस त्या दोघी घरातच आयसोलेशनमध्ये होत्या कारण त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण दिसत नव्हते. त्यानंतर ऐश्वर्याला थोडे लक्षण जाणवू लागल्यानंतर तिला व आराध्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :अमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्या