Join us

फैजल सिद्दीकीचे TikTok अकाऊंट बॅन केल्यानंतर; अभिनेता परेश रावल म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 13:19 IST

टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे

 टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे.  फैजलने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  तो एका मुलीवर पाणी (अ‍ॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो. यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अ‍ॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे.  फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला होता. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींनी ही फैजलवर निशाणा साधला होता. फैजल विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी टिक टॉक अॅप बॅन करण्याची मागणी केली आहे.

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बॅन 'टिकटॉक' असे ट्विट आहे. त्यांच्या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स आणि फॅन्स प्रतिक्रिया देत आहे. परेश रावल यांच्या प्रमाणेच कुशाल टंडननेदखील टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

 टिकटॉककडून ही एक अधिकृत स्टेंटमेट जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी टिकटॉक नियमानुसार कोणत्याच अशा व्हिडीओ परवानगी देत नाही ज्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा महिलांवरील अत्याचाराचे समर्थन होईल. अशा प्रकाराचे व्हिडीओ टाकण्याची परवानगी टिकटॉक कधीच देत नाही. तसेच फैजलेवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.   

टॅग्स :टिक-टॉकपरेश रावल