Join us
Daily Top 2Weekly Top 5

​एका ‘आई’ने घेतली कंगनाची बाजू हृतिकला खुले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 10:21 IST

कंगना-हृतिकच्या कोल्डवॉर  काहीसे ‘सोशल’ होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, या कोल्डवॉरमध्ये अनेकांनी कंगनाला पाठींबा देत, हृतिकला धोबीपछाड दिले आहे. ...

कंगना-हृतिकच्या कोल्डवॉर  काहीसे ‘सोशल’ होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, या कोल्डवॉरमध्ये अनेकांनी कंगनाला पाठींबा देत, हृतिकला धोबीपछाड दिले आहे.  कंगनाबद्दल हृतिकने लिहिलेले शब्द आणि तिच्यावर केलेले बेछूट आरोप, सभ्यतेच्या मर्यादा लांघणारे असल्याचे अनेकांचे मत आहे. हृतिकने कंगनाच्या मानसिक आरोग्याबाबत भाष्य करीत कंगना Asperger’s Syndrome ची रूग्ण असल्याचा आरोप हृतिकने केला आहे. हृतिकच्या या आरोपामुळे अनेकजण दुखावले आहेत. एका ९ वर्षांच्या मुलाची आई असलेल्या महिलेने या अशा वागण्याबद्दल हृतिकचा चांगलाच समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा ९ वर्षांचा चिमुकला स्वत: Asperger’s Syndrome चा रूग्ण आहे.Asperger’s Syndrome बद्दल अज्ञान असताना कंगनाला हा आजार असल्याचे जाहिर वक्तव्य करणे, चुकीचे आहे.  एक सेलिब्रिटी असताना हृतिकने असे बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे. मी तर म्हणेल, यासाठी हृतिकने कंगनाची क्षमा मागायला हवी, असे या आईने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे.