धमाकेदार परफॉर्मन्सेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
अलीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली.
धमाकेदार परफॉर्मन्सेस
अलीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली. महिलांसाठी हेल्पलाईनचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. तेव्हा सुभाष घई, तापसी पन्नू आदींनी येथे उपस्थिती नोंदवली. या इव्हेंटवेळी गायक अंकित तिवारी यांनी गाणी सादर करून सर्वांची मने मोहून टाकली. अर्णव गोस्वामी यांनी याठिकाणी महिलांसोबत संवाद साधला. तसेच हेल्पलाईनच्या गरजेविषयी सांगितले. गायिका हर्षदीप कौर यांनीही महिलांशी संवाद साधला. तसेच काही गाणी सादर करून महिलांना मंत्रमुग्ध केले. या इव्हेंटमध्ये महिलांसोबत संवाद साधून त्यांना बोलतं करण्याचं महत्त्वाचं काम मिनी माथुर यांनी केले. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत या इव्हेंटमध्ये आली असता तिनेही महिलांसोबत संवाद साधला. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई आणि पत्नी मुक्ता घई यांनीही या इव्हेंटला उपस्थिती नोंदवली. यावेळी महिलांचे अनुभव त्यांनी समजून घेतले. ‘बेबी’ गर्ल अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही उपस्थित महिलांशी संवाद साधला.