Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विद्याचा खुलासा : सिद्धार्थ माझ्यावर नाराज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 16:40 IST

अभिनेत्री विद्या बालन हिच्या संसारात कुरबुरी सुरु असल्याची खबर आहे. पती सिद्धार्थ राय कपूर विद्यावर नाराज असल्याचे बोलले जात ...

अभिनेत्री विद्या बालन हिच्या संसारात कुरबुरी सुरु असल्याची खबर आहे. पती सिद्धार्थ राय कपूर विद्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीमागचे कारण म्हणजे मॅडम कंगना. अहो,होय, कंगना रानोट.  आता लगेच सिद्धार्थ व कंगना असा काही संबंध जोडू नका... तसले काहीही नाही. सिद्धार्थ विद्यावर नाराज आहे, तो वेगळ्याच कारणाने. हे कारण म्हणजे विद्याने कंगनाला दिलेला पाठींबा. हृतिक-कंगना वादात विद्याने कंगनाची बाजू घेतली होती. कंगना स्वत:साठी लढते आहे, ही चांगली बाब आहे, असे सांगून विद्याने कंगनाची बरीच प्रशंसा केली होती. सिद्धार्थला ही बाब मुळीच रूचलेली नाही म्हणे??  विद्याने कंगना व हृतिकच्या वादात पडू नये, असे सिद्धार्थला वाटतेयं. त्यामुळे तो विद्यावर नाराज आहे. अर्थात खुद्द विद्याने या बातमीचा इन्कार केला आहे. ‘एक अलबेला’च्या पोस्टर लॉन्चवेळी सिद्धार्थ नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचे विद्याने सांगितले. सिद्धार्थ माझ्यावर नाराज आहे, हे तुमच्याकडूनच मला कळतेय. आत्तापर्यंत मला स्वत:  हे ठाऊकच नव्हते, असे विद्या म्हणाली.