Join us

Exclusive video : बॉलिवूडचा पहिला सेलिब्रेटी क्रिकेट मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 18:45 IST

शोमॅन राज कपूर, दिलीपकुमार, महमूद, शशी कपूर, निरुपा रॉय यांच्या अदा आपण पडद्यावर बघितल्या आहेत. मात्र त्यांना कधी मैदानावर क्रिकेट खेळताना आपण बघितले नसेल. १९५६ साली या सेलिब्रेटींमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. या सामान्यात दोन्ही टीमकडून ११-११ नव्हे, तर तब्बल २६-२६ खेळाडू होते. आश्चर्य वाटले ना. पण, हे खरे आहे.

शोमॅन राज कपूर, दिलीपकुमार, महमूद, शशी कपूर, निरुपा रॉय यांच्या अदा आपण पडद्यावर बघितल्या आहेत. मात्र त्यांना कधी मैदानावर क्रिकेट खेळताना आपण बघितले नसेल. १९५६ साली या सेलिब्रेटींमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. या सामान्यात दोन्ही टीमकडून ११-११ नव्हे, तर तब्बल २६-२६ खेळाडू होते. आश्चर्य वाटले ना. पण, हे खरे आहे. १९५६ मध्ये पटियालाच्या राजाने आयोजित केलेल्या या क्रिकेट मॅचमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचा जलवा बघावयास मिळाला. या मॅचमध्ये राज कपूर आणि दिलीपकुमार आपापल्या टीमचे कॅप्टन बनले होते. २६-२६ खेळाडूंच्या या मॅचमध्ये जेव्हा शम्मी कपूरसोबत निरुपा रॉय मैदानावर ओपनिंगसाठी उतरल्या तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अतिशय रंगतदार अशा या सामन्यात अनेक घडामोडी घडल्या. सर्व सेलिब्रेटी मैदानावर जबरदस्त एन्जॉय करताना बघावयास मिळाले. या सामन्यात झपाट्याने येत असलेल्या धावा काढताना होत असलेल्या गमतीजमती बघण्यासारख्या होत्या. प्रत्येक सेलिब्रेटी खेळाडू आपल्या स्टाइलमध्ये मैदानावर परफॉर्म करत होता. विकेट पडल्यानंतर अन् चौकार-षटकारांची आतषबाजी केल्यानंतर त्यांच्यातील उत्साह बघण्यासारख्या होता. मॅच संपल्यानंतर सर्व सेलिब्रेटी खेळाडू मैदानावर कोल्ंिड्रक्स घेतानाही या व्हिडीओमध्ये बघावयास मिळत आहेत. आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाºया या सेलिब्रेटींचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ बघितल्यानंतरही तुमचे नक्कीच मनोरंजन होईल. कारण सेलिब्रेटींचा क्रिकेटच्या मैदानावरील परफॉर्मन्स पडद्यावरील परफॉर्मन्सपेक्षा कमी नाही, हे नक्की.