Exclusive ‘उडता पंजाब’ : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 22:42 IST
‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक झाली आहे. साहजिकच ‘उडता पंजाब’ च्या निर्मात्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. कारण ...
Exclusive ‘उडता पंजाब’ : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न...
‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक झाली आहे. साहजिकच ‘उडता पंजाब’ च्या निर्मात्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. कारण यामुळे बॉक्स आॅफिसवरील कमाई प्रभावित होऊ शकते. भारतात पायरसी हा मोठा मुद्दा आहे. पण या प्रकरणात सेन्सॉर बोर्डाकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे. ‘उडता पंजाब’ ची सेन्सॉर कॉपी लीक करण्यामागे पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालीलसेन्सॉर बोर्ड तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता खरे काय, हे ठाऊक नाही. ‘उडता पंजाब’ची प्रिंट चित्रपटगृहांत पाठवण्यासाठी रेडी आहे. या प्रिंटचे एक्स्लुसिव्ह फोटो ‘सीएनएक्स डिजिटल’च्या हाती आलेत. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न..ही म्हण ‘उडता पंजाब’च्या बाबतीत तंतोतंत लागू पडलीय. येत्या शुक्रवारी रिलीज होत असताना उण्यापुºया दोन दिवसांपूर्वी ‘उडता पंजाब’ची कॉपी लीक झाली आहे.‘उडता पंजाब’ सुरुवातीपासूनच वादात सापडला. शिर्षकात असलेल्या ‘पंजाब’ या शब्दाने या चित्रपटावर आक्षेप नोंदवला गेला. आधी आलिया भट्टच्या तोंडी असलेल्या शिव्यांमुळे रान उठले. मग हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला. सेन्सॉर बोर्डाने यात तब्बल ८० कट्स सुचवले. शिवाय ‘पंजाब’या शब्दावरही आक्षेप नोंदवला. हा वाद शेवटी कोर्टात गेला. कोर्टात ‘उडता पंजाब’चा विजय झाला. केवळ एक कट सुचवत हा चित्रपट रिलीज करीत करण्यास परवानगी दिली. पण आता उडता पंजाब या चित्रपटाची 40 मिनिटांची क्लिप सोशल मीडियावर लीक झाली असून, या क्लिपमध्ये सिनेमातल्या महत्त्वपूर्ण दृश्यांचं चित्रीकरण दिसतं आहे. तर काही वेबसाइटच्या पोर्टलवर तर पूर्ण चित्रपट असल्याची माहिती आता समोर येते आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. यात एका कोपºयात ‘फॉर सेन्सॉर’ असे लिहिलेले आहे. दरम्यान चित्रपटाच्या एका टीमच्या सूत्राशी याबाबत संपर्क साधला असता, लीक झालेले लींक हटवण्यात आले असल्याचा दावा त्याने केले. सायबर सेलला तक्रारअनेक दिवसांपासून वादात अडकलेला 'उडता पंजाब' हा चित्रपट लीक झाल्याची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला प्राप्त झाली आहे.मुंबई हायकोटार्नं निमार्ता अनुराग कश्यप याला कोणतेही सीन कट न करता चित्रपट प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली होती. शुक्रवारी 17 तारखेला चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. अभिषेक चौबे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ह्यईश्कियाह्ण, ह्यदेढ इश्कियाह्ण हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत. चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.