Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : ​या मराठी अभिनेत्याच्या रिमा लागू कन्या आहेत असाच अनेकांचा समज होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 11:55 IST

रिमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे होते हे खूपच कमी जणांना माहीत आहे. रिमा लागू यांच्या आडनावामुळे त्या ...

रिमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे होते हे खूपच कमी जणांना माहीत आहे. रिमा लागू यांच्या आडनावामुळे त्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या कन्या आहेत असाच अनेकांचा समज होता. रिमा लागू यांनी लोकमतच्या ऑफिसला काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ही गोष्ट आमच्यासोबत शेअर केली होती. त्यांनी सांगितले होते की, मी श्रीराम लागू यांची मुलगी आहे का असे मला अनेक वेळा विचारण्यात येत असे. खरे तर श्रीराम लागू यांसारख्या महान नटाची मुलगी आहेस का हे कोणी मला विचारले तर मला त्याची खूप मजा यायची. अनेकवेळा तर मी त्यांची मुलगी नाही असे मी उत्तर देखील देत नसत. मी ही गोष्ट खूप एन्जॉय करत असे. श्रीराम लागूंची मुलगी असणे ही कोणासाठी देखील अभिमानास्पदच गोष्ट आहे. या गोष्टीचा मला अनेक वेळा फायदा देखील झाला आहे. मी याबाबत श्रीराम लागू यांना देखील अनेक वेळा सांगत असे की मला अनेक जण तुमचीच मुलगी समजतात. खरे तर माझे रिमा लागू हे नाव माझ्या लग्नानंतरचे आहे. माझे खरे नाव नयन भडभडे असून माझी आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे लेकुरे उदंड जाहले हे नाटक प्रचंड गाजले होते.रिमा लागू यांनी विवेक लागू यांच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर काहीच वर्षांत ते दोघे वेगळे झाले. त्यांना मृण्मयी ही एक मुलगी असून ती देखील बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहे.  Also read : ​Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेलAlso read :Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?