Join us

Exclusive : ​‘बॅडमॅन’ म्हणतो, मी कॉमन मॅनचे एक उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 17:45 IST

बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’म्हणजे गुलशन ग्रोवर. सुमारे ४०० वर चित्रपटांमधून ‘खलनायक’ साकारण्यानंतर गुलशन ग्रोवर बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कालांतराने ...

बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’म्हणजे गुलशन ग्रोवर. सुमारे ४०० वर चित्रपटांमधून ‘खलनायक’ साकारण्यानंतर गुलशन ग्रोवर बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कालांतराने हीच त्यांची ओळख बनली. विशेष म्हणजे गुलशन ग्रोवर यांनी ही ओळख अतिशय अभिमानाने मिरवली. बॉलिवूडने अमिताभ बच्चन यांना अँग्री यंगमॅनची ओळख दिली. शाहरूखला ‘राज’ तर सलमान खान यांना ‘प्रेम’अशी ओळख दिली. पण  अद्याप यापैकी कुठल्याही कलाकाराच्या लोकप्रीय व्यक्तिरेखेच्या नावावरून चित्रपटाचे नाव ठेवले गेले नाही. पण गुलशन ग्रोवर यांचा ‘बॅडमॅन’ याच नावाचा चित्रपट आपल्याला येत्या काळात पाहता येणार आहे. ‘बॅडमॅन’ हे या चित्रपटाचे नाव आहे, ‘बॅडमॅन’ हाच चित्रपटाचा आधार आहे आणि ‘बॅडमॅन’ओळख लाभलेले गुलशन ग्रोवह हेच या चित्रपटाचे हिरो आहेत. ‘बॅडमॅन’चे वैशिष्ट्य म्हणजे ही एक वेब मुव्ही आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गुलशन ग्रोवर यांनी  लोकमत ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रश्नोत्तर स्वरूपातील गुलशन ग्रोवर यांची मुलाखत खास आपल्यासाठी....प्रश्न : बॉलिवूडने तुम्हाला ‘बॅडमॅन’ही ओळख दिली. आता याच नावाचा चित्रपट येतोय. प्रेक्षकांना यात काय वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळणार आहे?गुलशन ग्रोवर : बॉलिवूडमधील माझ्या चित्रपटांतील खलनायकांच्या भूमिकांनी मला ‘बॅडमॅन’ हे नाव दिले. माझ्या याच नावाने चित्रपट येतोय आणि यात गुलशन ग्रोवर स्वत: या चित्रपटाचा हिरो आहे. या चित्रपटात माझे नाव ‘गुलशन ग्रोवर, बॅडमॅन’ आहे. पण हा चित्रपट वास्तव आणि कल्पना यांचे मिश्रण प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार. त्यामुळे हा चित्रपट आपल्यात एक वेगळा असा चित्रपट आहे. प्रश्न : ‘बॅडमॅन’ला गुलशन ग्रोवर यांचे बायोपिक म्हणता येईल?गुलशन ग्रोवर : माझ्यामते, बायोपिक नाही. ‘बॅडमॅन’मध्ये माझे खरे नाव असले तरी यात अनेक काल्पनिक गोष्टी आहे. सत्य आणि कल्पना याचे सुंदर मिश्रण म्हणून या चित्रपटाकडे बघता येईल. यात ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, कुणाल रॉय कपूर,महेश भट्ट, मनिषा कोईराला असे अनेक मोठे कलाकार अतिथी भूमिकेत(गेस्ट अपिअरन्स)दिसणार आहे. ऋषी कपूर यांचे नाव चित्रपटातही ऋषी कपूर हेच आहे. पण याऊपरही हा चित्रपट म्हणजे ‘बॅडमॅन’भोवती गुंफलेली काल्पनिक कथा आहे, असे मी सांगेल.प्रश्न :‘बॅडमॅन’ ही वेब मुव्ही आहे, हा आत्तापर्यंतचा पहिला प्रयोग आहे, यावर आणखी प्रकाश टाकाल?गुलशन ग्रोवर : हे डिजिटल युग आहे. आत्तापर्यंत डिजिटल प्रेक्षकांना चित्रपट म्हणून जुना-पुराना माल दाखवला जात होता. सिनेमागृहात झळकलेला, टीव्हीवर आलेला चित्रपट इंटरनेटच्या प्रेक्षकांना दाखवला जायचा. पण Viacom18 ने प्रथमच  ‘बॅडमॅन’च्या रूपात आपल्या डिजिटल प्रेक्षकांना सन्मानपूर्वक काहीतरी वेगळे व नवे देण्याचा प्रयत्न आहे. डिजिटल युग हेच भविष्य असेल तर डिजिटल व्युवर्सलाही सन्मानपूर्वक वागणूक मिळायला हवी. त्यामुळेच Viacom18 ने खास आपल्या डिजिटल प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण चित्रपट बनवला आहे.  हा भारतीय सिनेमातील पहिला प्रयोग आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात वेब मुव्ही तयार व्हायला लागल्या तर आपणास आश्चर्य वाटायला नको.  बॅडमॅन’ लोकांना आवडलाच तर यानिमित्ताने अनेकांना वेब मुव्हीच्या माध्यमातून एक नवा प्लटफॉर्म मिळू शकेल. अनेकांकडे चांगल्या स्क्रीप्ट आहेत. पण प्लॅटफॉर्म नाही. अशास्थितीत वेब मुव्ही हे नवे माध्यम अनेकांच्या कलागुणांना वाव देणारे ठरेल. मी या प्रक्रियेचा भाग असेल तर याचा मला आनंद आहे.प्रश्न : ‘बॅडमॅन’च्या माध्यमातून गुलशन ग्रोवर स्वत:ला रिलॉन्च करताहेत, अशीही चर्चा आहे, यात कितपत सत्यता आहे.गुलशन ग्रोवर : रिलॉन्च हा चित्रपटाचा एक भाग आहे. आज चित्रपटातून खलनायक गायब झाले आहेत. अशास्थितीत माझ्यासारखा एक खलनायक हिरो म्हणून येणे वेगळी गोष्ट आहे आणि मी नाही तर व्हायाकॉम १८ मला रिलॉन्च करीत आहे.प्रश्न : चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार अतिथी भूमिकेत आहेत, याबद्दल काय सांगाल.गुलशन ग्रोवर : बॉलिवूडमध्ये माझे सर्व मित्र आहे. माझ्या अनेक मित्र यात अतिथी भूमिकेत आहेत. यातील काहींची नावे उघड झाली आहेत. मात्र जेव्हा केव्हा चित्रपट प्रेक्षक बघतील, त्यांना कळेल की, एवढेच नाही तर आणखी माझे अनेक मित्र यात अतिथी भूमिकेत आहे. हे चित्रपटाचे निश्चित एक आकर्षक आहे.प्रश्न :  तुम्ही शेकडो चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ‘बॅडमॅन’मधील भूमिकेला गुलशन ग्रोवर यांचा ‘ड्रिमरोल’ म्हणता येईल.गुलशन ग्रोवर : ‘बॅडमॅन’मधील माझी भूमिका ड्रिम रोल तर नाही. पण ‘डेअरिंग’ म्हणता येईल. यातली माझी भूमिका आव्हानात्मक आहे. इंटरेस्टिंग आहे. एका खलनायकाभोवती चित्रपटाची पूर्ण कथा गुंफली जाणे, हे प्रथमच घडतेयं आणि माझ्यासाठी ते नावीण्यपूर्ण, रोचक आहे. प्रश्न :  ‘बॅडमॅन’मधील  भूमिका ड्रिम रोल  नाही तर ‘डेअरिंग’ आहे,असे असेल तर आपला ‘ड्रिमरोल’कुठला असू शकेल?गुलशन ग्रोवर : बघा, कलाकार अतिशय हावरट असतात. भूकेले असतात. मीही त्यापैकीच एक़ माझे अनेक ड्रिम रोल आहेत. कुठल्याही विशिष्ट अशा एका भूमिकेने माझे पोट भरणारे नाही. माझी कलेची लालसा संपणारी नाही. प्रश्न : ८०-९०च्या दशकातील खलनायक आणि आत्ताचे खलनायक यात आपल्याला काय फरक वाटतो?गुलशन ग्रोवर : त्याकाळात खलनायक खरोखरचं प्रभावशाली होते. त्यांच्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या भूमिकाही लिहिल्या जात होत्या. मी नेहमी म्हणतो की, जर तुम्ही देखणे असाल तर एकवेळ तुम्ही हिरो बनू शकता. पण तुम्हाला यशस्वी खलनायक व्हायचे असेल तर अभिनयाचे अंग असल्याशिवाय ते शक्य नाही. तुम्हाला पडद्यावर कमी दृश्य मिळतात, तुमच्या भूमिकेला ऐनवेळी कात्री लागण्याची शक्यता असते, अशास्थितीत खलनायकाना आपल्यातील अभिनय पणाला लावणे गरजेचे असते. आधीचे खलनायक म्हणूनच प्रभावशाली  होते. आत्ताचे म्हणाल तर आज खलनायक चित्रपटातून गायब झाला आहे. दिसला तरी ‘सेन्सशेनल न्यूज’  बनण्यासाठी खलनायक पडद्यावर आणला जातो. मग एखादा डायरेक्टर खलनायक बनतो. कधी हिरोला खलनायकची भूमिका दिली जाते. करण जोहर त्याचे उदाहरण आहे. मला काय, पण अख्ख्या जनतेला खलनायक म्हणून करण रूचला नाही, हे वास्तव आहे.प्रश्न : गुलशन ग्रोवर हा ‘ बॅडमॅन’ व्यक्तिगत आयुयात कसा आहे.गुलशन ग्रोवर :  . मी  कॉमन मॅनचे एक उदाहरण आहे. कला , काम, कष्ट आणि परमेश्वराची कृपा या जोरावर मी एवढे मोठे यश मिळवले. माझे हे यश म्हणजे लोकांच्या प्रेमाची पावती आहे. मी पडद्यावर बॅडमॅन असलो तरी घरात अतिशय भावूक  सदस्य आहे. मला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते. त्यामुळे घरातही मी हे परफेक्शन आणण्यासाठी लक्ष घालत असतो. मग ती घराची साफसफाई असो वा घराशी निगडीत अन्य कामे.प्रश्न :शूटींग नसेल तर गुलशन ग्रोवर काय करतात, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.गुलशन ग्रोवर :  शूटींग नसेल तर फावला वेळ मिळतोच, असे नाही. पण मिळालाच तर माझा बराचसा वेळ जिममध्ये जातो. येणाºया चित्रपटांची तयारी, कपड्यांची ट्रायल अशा कामात जातो. याशिवाय घरातील अनेक कामांत मी जातीने लक्ष घालतो. प्रश्न : काम आणि कुटुंब यात संतुलन कसे साधतागुलशन ग्रोवर :  काम आणि कुटुंब यात संतुलन साधणे अतिशय कठीण आहे. माझ्या कुटुंबाने मला सांभाळून घेतले आहे. त्यांना वेळ देऊ शकत नाही,पण ते सांभाळून घेतात.  अनेक तासांचा प्रवास, कामाच्या विचित्र वेळा, वेगवेगळ्या अफवा या सगळ्यांत कुटुंब तुमच्या पाठीशी हवे. माझे कुटुंब माझ्या सोबत आहे. माझ्या यशात निश्चितपणे त्यांचा मोठा वाटा आहे.प्रश्न :सध्याचा आवडता अभिनेता वा अभिनेत्री कोणगुलशन ग्रोवर :  असे नेमके नाव सांगता येणार नाही. सगळे माझे मित्र आहे. कारण माझ्या मते, एका अ‍ॅक्टरचा चित्रपटातील अभिनय, हे केवळ त्याचे एकट्याचे श्रेय  नसते. एक गुणी दिग्दर्शक, एक प्रतिभावान लेखक, एक काबील एडिटर असे सगळे जण त्याच्या यशात सामील असतात.त्याचे यश अशा सगळ्यांच्या कलागुणांचे मिश्रण असते. त्यामुळे व्यक्तिश: मी कुठलाही एक नट, नटी वा खलनायकाच्या कुठल्याही चित्रपटातील परफॉर्मेन्सने प्रभावित होणारा नाही. मी त्यांचे   कष्ट, प्रामाणिक पणा आणि खºया आयुष्यात ते कसे आहेत, याला महत्त्व देतो.