Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या आत्महत्येनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची अशी झाली होती अवस्था, प्रार्थना बेहरेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:42 IST

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा देताना प्रार्थना बेहरे खूप भावूक झाली होती. ती म्हणाली सुशांत माझ्या खूप जवळचा होता. तो मला छोटी बहिण मानत होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जगाचा निरोप घेतला यावर कुणाचाच अद्याप विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे ज्यांनी त्याच्यासोबत काम केले आहे, ते कलाकार अजून या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. त्याची पवित्र रिश्तामधील सहकलाकार प्रार्थना बेहरेने त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना खूप भावूक झाली होती. तिने हेदेखील सांगितले की, अंकिता लोखंडे आणि महेश शेट्टी यांना जज करणं बंद करा. त्यांनादेखील या घटनेमुळे धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने यावर कोणतीच कमेंट केली नाही आणि त्याचा मित्र महेश शेट्टीने फोन उचलला नाही म्हणून नेटकरी टीका करत आहेत. यावर सुशांत व अंकिता यांची पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार प्रार्थना बेहरे हिने सांगितले की, मी अंकिताबद्दल सांगू शकते. ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे आणि खूप रडते आहे. पण लोकांना समजले पाहिजे की प्रत्येक जण आपल्या जीवनात पुढे निघून गेलेत. बातम्या पाहिल्यावर ते तिथेच अडकून पडले आहेत. पण तिच्या जीवनात कुणी दुसरे आहे आणि तिला त्या नात्यांचाही आदर ठेवायचा आहे.

ईटाइम्स टीव्हीशी बोलताना प्रार्थना म्हणाली, सुशांत माझ्या खूप जवळचा होता. तो मला छोटी बहिण मानत होता कारण पवित्र रिश्तामध्ये मी अंकिताची बहिण होती. माझा सुशांत आता जगात नाही यावर विश्वासच बसत नाही. मला फोन आले की सुशांतने आत्महत्या केली आणि हे ऐकून मी स्तब्ध झाले. पवित्र रिश्ता मालिकेनंतर प्रार्थना सुशांतच्या फार टचमध्ये नव्हती.

ती पुढे म्हणाली की, पवित्र रिश्ताच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बरेच मेसेज आले होते. मी उशीराने पाहिले. मला काही समजले नाही म्हणून मी अंकिताला फोन लावला. ती खूप रडत होती.

मग मी महेश शेट्टीला फोन केला तर तोही रडत होता आणि त्याच्या अंत्य संस्काराला जात होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतप्रार्थना बेहरेअंकिता लोखंडे