Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगतो ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 10:59 IST

 उत्साह, अभिनय आणि कलाकारीने पूर्ण असलेले रणवीर सिंगचे व्यक्तिमत्त्व नेहमीच बॉलीवूडचा चर्चेचा मुद्दा ठरलेला असतो. कुठल्याही सोहळ्यात त्याचा उत्साह ...

 उत्साह, अभिनय आणि कलाकारीने पूर्ण असलेले रणवीर सिंगचे व्यक्तिमत्त्व नेहमीच बॉलीवूडचा चर्चेचा मुद्दा ठरलेला असतो. कुठल्याही सोहळ्यात त्याचा उत्साह पाहिल्यावर असे वाटते की, तो  कलाकार असल्याचे विसरला आहे.सर्वसामान्यांप्रमाणे प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. तो म्हणतो,‘आयुष्याबद्दल मला खुप प्रेम आहे. आयुष्याबद्दल विशेष आस्था आहे. जगण्याच्या बाबतीत मी फार स्वार्थी आहे. जेवढे जास्त एन्जॉय करता येईल तेवढे चांगले म्हणून मी जगतो.येणारा प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत शेवटचा दिवस असल्यासारखे मी जगतो. माझ्या एनर्जीचे मुळ गुपितच हे आहे की, माझी विचारसरणी अशी आहे. ’