Join us

प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यातही करीना कपूर करतेय काम, जाहिरातीचे केले शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 19:13 IST

प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही करीना कपूर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

अभिनेत्री करीना कपूर पुढील आठवड्यात दुसऱ्या बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. सोमवारी तिला चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाताना पाहिले होते. आता प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही करीना कपूर खूप एक्टिव्ह आहे. आता तिची नवीन जाहिरात समोर आली आहे, ज्यात ती एरिअल वॉशिंग पावडरसाठी शूट केले आहे. करीना कपूरने या जाहिरातीचा व्हिडीओ स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. करीना कपूरच्या या व्हिडीओवर काही युजर्सनी म्हटले की, तू खूप मेहनती आहे. एका युजरने लिहिले की, तू खूप मेहनती महिला आहेस, ग्रेट बेबो.

या व्हिडीओत करीना कपूरचा बेबी बंप पहायला मिळतो आहे. यात समजते की हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शूट करण्यात आला आहे.या पूर्वी तिने स्पोर्ट्स आणि इनरवेअर कंपनी पुमासाठी फोटोशूट केले होते. इतकेच नाही तर ती योगादेखील करताना दिसली होती. 

करीना कपूर नेहमी प्रेग्नेंसीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ख्रिसमसपासून नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनला ती पार्टी करताना दिसली आहे. प्रेग्नेंसीच्या काळात ती खूप एक्टिव्ह दिसली.

करीना कपूर खान आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला तिने प्रेग्नेंसीच्या सुरूवातीच्या महिन्यात सुरूवात केली होती.मागील वर्षी ती नवरा सैफ अली खान आणि तैमूरसोबत धर्मशाळामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तिथे सैफ अली खान भूत पोलीस चित्रपटाचे शूटिंग करत होता.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान