Join us

गर्भवती असतानाही मौसमी चॅटर्जीला दिग्दर्शकांनी करायला लावला होता रेप सीन, वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:25 IST

‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यासोबत अशी काही घटना घडली की, त्या ही घटना ...

‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यासोबत अशी काही घटना घडली की, त्या ही घटना अजूनही विसरू शकल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मौसमी यांनी याबाबतचा खुलासा केला होता. त्यांनी चित्रपटातील एका सीन्सचा किस्सा सांगताना एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचे झाले असे की, ‘या चित्रपटात मौसमीसोबत एक रेप सीन शूट करायचा होता. मात्र या सीनसाठी मौसमी अजिबातच तयार नव्हत्या. कारण या सीनमुळे त्या सुरुवातीपासून घाबरून होत्या. घाबरण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या. जेव्हा हा सीन शूट करायचा होता, तेव्हा त्या खूपच घाबरून गेल्या. त्यांना समजत नव्हते की, हा सीन करायचा तरी कसा. तर चित्रपटासाठी हा सीन खूपच महत्त्वाचा होता. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या मनोजकुमार यांचा मौसमी खूपच आदर करायच्या. या एकमेव कारणामुळे त्यांनी सीन करण्यास होकार दिला. हा सीन गव्हाच्या पिठाच्या एका गुदाममध्ये शूट करायचा होता. सर्व तयारी झाली होती, मौसमीदेखील घाबरतच हा सीन शूट करण्यासाठी सेटवर आल्या होत्या. या सीनमध्ये गुंड मौसमीचे कपडे काढताना दाखवायचे होते. त्यामुळे मौसमीने अगोदरच एकावर एक कपडे परिधान केले होते. सीननुसार गुंडांना मौसमी यांचे पूर्ण कपडे फाडून त्यांच्या शरीराला पीठ लावायचे असते. ठरल्यानुसार मौसमी यांनी हा सीन दिला, परंतु त्यानंतर बरेच दिवस त्यांची प्रकृती बिघडली. मौसमी यांचे डोक्याचे केस खूप मोठे होते, परंतु आटा त्यांच्या केसांमध्ये अक्षरश: चिटकला होता. मौसमी यांनी एका मुलाखतीदरम्यान हा सर्व किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा हा सीन करून मी घरी परतली होती, तेव्हा मी रात्रभर रडत होती. त्या रात्री मला बºयाच उलट्या झाल्या. हा सीन माझ्या करिअरमधील सर्वात अवघड सीन होता. या आठवणी मी कधीही विसरू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.