Join us
Daily Top 2Weekly Top 5

Evelyn Sharma:'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आहे, दाखवली बाळाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:28 IST

'ये जवानी है दीवानी'मध्ये लाराची भूमिका साकारणारी एवलिन शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

'ये जवानी है दीवानी'मध्ये लाराची भूमिका साकारणारी एवलिन शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना एवलिनने लिहिले, की तिने मुलाला जन्म दिला आहे. याआधी एवलिनना एका मुलगी आहे. 

एलविनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून फोटो तिने मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, 'बाळाला जन्म दिल्यानंतर इतकं छान वाटलं असं कधी वाटलं नव्हतं.' एवलिनने बाळाचं नाव अर्डन ठेवल्याचा उलगडा तिच्या या पोस्टमधून झाला आहे. 

गेल्या वर्षी एवलिनच्या मुलीचा जन्म झाला होता. तिने आपल्या मुलीचं नाव एवा ठेवलं आहे. मुलीच्या जन्मानंतर १४ महिन्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्रीने आपण दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं होते. बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा तिने एक फोटो शेअर केला होता. 

अनेक हिंदी चित्रपटात केलं कामएवलिन शर्मा ही एक जर्मन मॉडेल असून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फ्रॉम सिडनी विथ लव्ह या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'ये जवानी है दिवानीमध्ये' दिसली. याशिवाय नौटंकी साला, यारियां, मैं तेरा हीरो, कुछ कुछ लोचा है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली.

एवलिन शर्माने 15 मे 2021 रोजी ऑस्ट्रेलियात बॉयफ्रेंड तुषान भिंडीसोबत लग्न केलं. तिचा पती भारतीय वंशाचे डेंटल सर्जन आहे. दोघे 2018 सालापासून मित्र होते आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघांनी लग्न केले.

टॅग्स :सेलिब्रिटी