Join us

सगळ्या पोस्ट डिलीट केल्यानंतर ईशा गुप्ताने शेअर केला अधिक Bold फोटो, 3 दिवसांत अनेक वेळा झाले अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 13:02 IST

ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते

ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपली सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाख फॉलोअर्सना जाणून घ्याची इच्छा आहे तिने सगळे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. सगळे फोटो डिलीट केल्यानंतर ईशाने पुन्हा एकदा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे. 

ईशा गुप्ताने नीळ्या रंगाच्या डेनिम जॅकेट घातलेला फोटो शेअर केला आहे. ईशाच्या या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. याचसोबत फॅन्स तिला पोस्ट डिलीट करण्या मागचे कारण देखील विचारत आहेत. 

 ईशाने फॅन्सच्या प्रश्नांचे उत्तर इन्स्टाग्राम स्टोरीवर दिले आहे. तिने सांगितले की, तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून तिचे अकाऊंट हॅक होत होते. घाबरण्याचे कारण नाही ईशा घरात सुरक्षित असल्याचे तिने सांगितले आहे. 

 ईशाने काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते, मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले. मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती.

टॅग्स :ईशा गुप्ता