Join us

2022 तुझं आणि माझं...! सगळ्यांसमोर रोमॅन्टिक झाली ईशा गुप्ता, बॉयफ्रेन्डसोबत लिपलॉक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 12:48 IST

Esha Gupta Romantic Picture: ईशा गुप्ता नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या ती चर्चेत आहे ती, तिच्या बॉयफ्रेन्डमुळे.

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अ‍ॅक्ट्रेस ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या ईशा चर्चेत आहे ती, तिच्या बॉयफ्रेन्डमुळे. होय, बॉयफ्रेन्डसोबत तिनं काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.  '2022 तुझं आणि माझं...' या पोस्टसोबत अभिनेत्रीने 4 फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ईशा व बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस गुलार (Manuel Campos Guallar) दोघंही रोमॅन्टिक पोझ देत आहेत.  एका फोटोत ती  बॉयफ्रेंडसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने तपकिरी रंगाचा स्टेप डीप नेक गाऊन घातला आहे.

खरे तर ईशा गुप्ताच्या रिलेशनशिपची चर्चा याआधीही अनेकदा झाली. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचं  नाव जोडलं गेलं.  पण ईशाने प्रत्येकवेळी रिलेशनशिपच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. गतवर्षी तिनं मॅन्युएलसोबतचं नांतं  जगजाहिर केलं होतं. मॅन्युएल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो.

2012मध्ये ‘जन्नत 2’ द्वारे ईशाने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचं नॉमिनेशन मिळालं होतं.    ईशा गुप्ता गेल्या वर्षी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झालेल्या नकाब या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती. आता ईशा ‘इनव्हिजिबल वुमन’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी दिसणार आहे.  

टॅग्स :ईशा गुप्ता