Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:54 IST

कलाकारांच्या नावांच्या स्पेलिंगमुळे बऱ्याचदा हा गोंधळ झाल्याचं दिसून येतं. निसा देवगणनंतर आता ईशा देओलने तिच्या नावाचा खरा उच्चार सांगितला आहे.

सेलिब्रिटींचं लाइफस्टाइल आणि त्यांच्या फॅशनबरोबरच कलाकारांची नावे हादेखील अनेकदा चर्चेचा मुद्दा बनतो. अनेक कलाकारांच्या नावाच्या स्पेलिंग लक्ष वेधून घेतात. तर कधी कलाकार नावाचा चुकीचा उच्चार झाल्यामुळे संतप्त झालेले दिसतात. अजय देवगणची लेक निसा हिनेदेखील तिच्या नावाचा खरा उच्चार काय हे सांगितलं होतं. माझं नाव न्यासा नाहीतर निसा आहे, असं ती म्हणाली होती. कलाकारांच्या नावांच्या स्पेलिंगमुळे बऱ्याचदा हा गोंधळ झाल्याचं दिसून येतं. निसा देवगणनंतर आता ईशा देओलने तिच्या नावाचा खरा उच्चार सांगितला आहे.

ईशा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक असलेल्या ईशाला घरातून अभिनयाचं बाळकडू मिळालं. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ईशाने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं. 'कोई मेरे दिल से पुछे', 'धूम', 'ना तुम जानो ना हम', 'युवा', 'आँखे', 'राज ३', 'LOC कारगिल' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ती दिसली. पण, ईशाला हवं तसं सक्सेस मिळालं नाही. सध्या मनोरंजन विश्वापासून ईशा दूर असली तरी चर्चेत असते. 

ईशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती तिच्या नावाचा खरा उच्चार नेमका काय आहे, याबाबत सांगताना दिसत आहे. इन्स्ंटट बॉलिवूडच्या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ती म्हणते, "आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय. ईशा नाहीतर एशा देओल माझं नाव आहे. हा संस्कृत शब्द आहे". 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईशा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होती. ईशा पती भरत तख्तानीपासून वेगळी झाली आहे. २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. सुखी संसाराच्या १२ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुली आहेत.

टॅग्स :इशा देओलसेलिब्रिटी