ईशा देओलने शेअर केलेल्या फोटोत दिसली मुलगी राध्याची झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 21:46 IST
अभिनेत्री ईशा देओल हिने एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये मुलगी राध्याची झलक दिसली आहे. वाचा सविस्तर!
ईशा देओलने शेअर केलेल्या फोटोत दिसली मुलगी राध्याची झलक!
अभिनेत्री ईशा देओल हिने एक फोटो शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये ‘राध्याची एक झलक’ असे लिहिले आहे. मग हा फोटो ईशा देओलच्या मुलीचा आहे काय? नाही, वास्तविक ईशाने तिच्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने असे दाखविण्याचा प्रयत्न केला, जणूकाही तिच्या मुलीचाच तो फोटो असावा. पण काहीही असो, फोटोमध्ये दिसत असलेली छोटी ईशा खूपच क्यूट दिसत आहे. लहानपणीच्या फोटोमध्ये ईशाने पिंक कलरचा फ्रॉक घातला असून, तिच्या डोक्यावर भारतीय लष्कराची टोपी दिसत आहे. याअगोदर ईशाने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती पतीसोबत बघावयास मिळत होती. या फोटोला कॅप्शन देताना ईशाने लिहिले होते की, ‘स्नो डेच्या आठवणी, माझ्या प्रेमळ व्यक्तीसोबत माझे सुंदर जग’ दरम्यान, मुलीच्या जन्माअगोदर ईशाने बेबी बम्पसह अनेक फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरलही झाले होते. ईशाने २० आॅक्टोबर २०१७ रोजी मुलगी राध्याला जन्म दिला. मुंबई मिरर रिपोर्टनुसार, जेव्हा ईशाने मुलगी राध्याला जन्म दिला होता तेव्हा तिचा पती भरत तख्तानीने म्हटले होते की, मला आज एवढा आनंद झाला की, मी तो शब्दात सांगू शकत नाही. मला असे वाटते की, माझी मुलगी माझ्यासारखीच आहे. जेव्हा ती हसते तेव्हा संपूर्ण जग आनंदी होत असावे, असे मला वाटते.