Join us

विद्या बालनला किस करताना बॉलिवूडच्या 'सीरिअल किसर' फुटला होता घाम, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 18:25 IST

इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याला तसं तर बॉलिवूडचा सर्वात मोठा सीरिअल किसर मानलं जातं. पण विद्या बालनला (Vidya Balan) किस करताना त्याला घाम फुटला होता.

विद्या बालन (Vidya Balan)ला बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. आपल्या भूमिकेत कसा जीव ओतायचा हे विद्याला चांगलंच माहीत आहे. तशी तर अभिनेत्रीला बोल्ड भूमिका करण्यात काहीच अडचण नव्हती. पण तिच्यासोबत किसींग सीन करताना बॉलिवूडचा सीरिअल किसर इम्रान हाश्मी (Emraan Hashmi)ला घाम फुटला होता. कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

इम्रानला होती ही अडचण

इम्रान हाश्मी याला तसं तर बॉलिवूडचा सर्वात मोठा सीरिअल किसर मानलं जातं. पण विद्या बालनला किस करताना त्याला घाम फुटला होता. इम्रानने आतापर्यंत करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत त्याने हॉट सीन दिले आहेत. पण विद्या बालनसोबत किसींग सीन करताना त्याला अडचणीचा सामना करावा लागला होता. 

किसींगची वाटत होती भीती

इम्रान हाश्मी आणि विद्या बालनने २०१३ साली आलेल्या 'घनचक्कर' सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात दोघांचे काही इंटिमेट सीन आणि किसींग सीन होते. सिनेमा भलेही फार गाजला नसला तरी यातील किसींग सीन मात्र चर्चेचा विषय ठरले होते. असं  सांगितलं जातं की, या सिनेमात विद्या बालनसोबत किसींग सीन केल्यावर इम्रान खान घाबरत होता आणि तिला एक प्रश्न विचारत होता.

विद्यानेच केला होता खुलासा

या सिनेमाची निर्मिती विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर याने केली होती आणि याच कारणाने इम्रान हाश्मीला घाम फुटत होता. असं सांगितलं जातं की, विद्यासोबत किसींग सीन शूट केल्यावर इम्रान तिला विचारत होता की, सिद्धार्थ काय म्हणेल? तुला वाटतं का तो मला माझा पेमेंट चेक देईल? नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर' चॅट शोमध्ये विद्याने या किस्स्याचा खुलासा केला होता. विद्याने सांगितलं की, इम्रान निर्माता सिद्धार्थमुळे फार असहज होता.

टॅग्स :इमरान हाश्मीविद्या बालन