येत्या शुक्रवारी म्हणजे १८ जानेवारीला इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’, थांबा...थांबा...‘चीट इंडिया’ नाही तर ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट रिलीज होतोय. होय, रिलीजच्या ऐन तोंडावर इमरानच्या या चित्रपटाचे नाव बदलून ‘व्हाय चीट इंडिया’ करण्यात आले आहे. सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. चित्रपटाचे ‘चीट इंडिया’ हे शीर्षक भ्रामक व वादग्रस्त असल्याचे सेन्सॉर बोर्डाचे मत पडले. अखेर सेन्सॉर बोर्डाचा आदेश मानत निर्मात्यांनी ‘चीट इंडिया’चे ‘व्हाय चीट इंडिया’ असे नवे नामकरण केले. आता ‘व्हाय चीट इंडिया’ या नावानेच हा चित्रपट प्रदर्शित होईल.
‘चीट इंडिया’ नाही ‘व्हाय चीट इंडिया’! ऐनवेळी बदलले इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 15:45 IST
सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले.
‘चीट इंडिया’ नाही ‘व्हाय चीट इंडिया’! ऐनवेळी बदलले इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे नाव!!
ठळक मुद्देयाआधी ऐनवेळी ‘व्हाय चीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली गेली होती. आधी हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘मणिकर्णिका’,‘ठाकरे’ या चित्रपटांशी बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी ‘व्हाय चीट इंडिया’च्या मेकर्सनी अचानक आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी एक आठव