Join us
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान हाश्मीची अभिनेत्री उदिता गोस्वामीचे लेटेस्ट फोटो पाहून थक्क झाले फॅन्स, म्हणाले - ही तिच आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:09 IST

Udita Goswami : तिची आणि इम्रान हाश्मीची केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. तरूणाई तिच्यावर फिदा झाली होती. तसेच ती बोल्ड रोल्समुळेही फेमस होती. पण नंतर ती सिने इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

उदिता गोस्वामी (Udita Goswami) ने काही मोजक्याच सिनेमात काम केलं. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. इम्रान हाश्मीसोबत जहर आणि अक्सरसारख्या सिनेमात तिने धमाका केला होता. 'पाप' सिनेमात उदिता जॉन अब्राहमसोबत एका बुद्धीस्ट तरूणीच्या रोलमध्ये दिसली होती. या सिनेमातील जॉन आणि तिची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. तसेच तिची आणि इम्रान हाश्मीची केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. तरूणाई तिच्यावर फिदा झाली होती. तसेच ती बोल्ड रोल्समुळेही फेमस होती. पण नंतर ती सिने इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

देहरादूनमध्ये जन्माला आलेली उदिता अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडलही होती. तिचे वडील बनारस आणि आई शिलॉन्गची आहे. काही सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी उदिताने करिअर यशाच्या शिखरावर असतानाच दिग्दर्शक मोहित सूरीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. बरीच वर्ष डेट केल्यानंतर 2013 मध्ये तिने मोहितसोबत लग्न केलं. मोहितला आणि तिला दोन मुलं आहेत. उदिता नात्याने आलिया भट्टची वहिनी लागते तर इम्रान हाश्मी तिचा दीर लागतो.

बरीच वर्ष रूपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर उदिता 2014 मध्ये पती मोहित सूरचे कथित कॉल डिटेल्स काढण्यावरून चर्चेत आली होती. यावारून चांगलाच वाद झाला होता. बरेच दिवस हे प्रकरण मीडियात चर्चेत होतं. मात्र, या घटनेनंतर मोहित आणि उदिता वेगळे झाले नाहीत. उदिता आपल्या परिवारासोबत आनंदी आहे. उदिता सोशल मीडियावरही चांगली अॅक्टिव असते. फॅन्ससाठी ती फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी