Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेने शेअर केली इमोशनल पोस्ट; आई होण्याबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 17:54 IST

आई होण्याबाबत काय म्हणाली अंकिता...

ठळक मुद्देसुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत खूप खूश होते आणि ते दोघेही लग्न करणार होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे पार कोलमडली होती. सुशांत व अंकिता सहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या कुटुंबाच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणीही तिने लावून धरली होती. सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अंकिता हळूहळू सावरताना दिसतेय. याला कारण आहे तिची आई. गेल्या काही दिवसांत अंकिताच्या आईने तिला एकक्षणही एकटे सोडले नाही. आईच्या खंबीर पाठींब्यामुळे अंकिता सुशांतच्या मृृत्यूच्या धक्क्यातून बाहेर पडली, असे म्हटले तरी वावगे ठरणार आहे. काल शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर अंकिताने आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले.

अंकिताने आईसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  ‘मला लाभलेली माझी पहिली आणि आयुष्यभराची सर्वात आवडती टीचर. तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आई...मी माझ्या मुलांसाठीही तुझ्यासारखे होऊ इच्छिते..लव्ह यू आई..,’ अशा शब्दांत अंकिताने आईचे आभार मानले आहेत. अंकिताची ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

म्हणून झाले होते अंकिता व सुशांतचे ब्रेकअपसुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत खूप खूश होते आणि ते दोघेही लग्न करणार होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. त्या दोघांनीही कधीही याचे कारण समोर आणले नाही. सुशांत आणि अंकिता यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर झलक दिखला जा या रिएलिटी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्याने अंकिताला सर्वांसमोर प्रपोज केले होते. 2016 साली ते दोघे लग्न करणार होते. मात्र याच वर्षी सुशांत आणि अंकिता विभक्त झाले. असे म्हणतात की, सुशांत बॉलिवूडमध्ये काम करू लागल्यानंतर अंकिता खूपच अस्वस्थ झाली होती. ती सतत सुशांतला फोन किंवा मेसेज करून त्याची चौकशी करायची. इतर अभिनेत्रींसोबतचे जवळीक साधणारे सीन तिला अस्वस्थ करायचे. याबाबत अनेकदा सुशांतने अंकिताला समजावले की त्याच्या आयुष्यात अंकितशिवाय दुसरे कोणीही नाही. अंकिताच्या याच वागण्याला वैतागून सुशांत तिच्यापासून वेगळा झाला होता.

टॅग्स :अंकिता लोखंडे