Join us
Daily Top 2Weekly Top 5

​वडील जनावरासारखे मारायचे...कमाल खानची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 21:53 IST

अभिनेता कमाल आर. खान सोशल मीडियावरील त्याच्या वादग्रस्त पोस्टसाठीच अधिक ओळखला जातो. सेलिब्रिटींविरूद्ध वादग्रस्त असे काहीसे लिहून वाद ओढवून ...

अभिनेता कमाल आर. खान सोशल मीडियावरील त्याच्या वादग्रस्त पोस्टसाठीच अधिक ओळखला जातो. सेलिब्रिटींविरूद्ध वादग्रस्त असे काहीसे लिहून वाद ओढवून घेणे, हा कमालचा आवडता उद्योग. यावरून अनेकदा बºयाच सेलिब्रिटींसोबत त्याचा वादही झाला आहे. पण आज फादर्स डेच्या दिवशी कमाल खानने काहीसी इमोशनल पोस्ट लिहिली आहे. टिष्ट्वटरवर टॉप हॅशटॅगचा वापर करीत कमालने वडिलांबाबत लिहिले आहे. माझ्या वडिलांनी मला खूप सतावले. ते मला जनावरांसारखे मारायचे. लहानपणी प्रत्येक दिवशी त्यांनी मला मारले. त्यासाठी हॅपी फादर्स डे...असे कमालने लिहिलेय..