Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातून बाहेर आल्यावर एल्विश यादव सहकुटुंब मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 10:26 IST

तुरुंगातून बाहेर आल्यावर एल्विश यादव मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलाय. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत

 YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव काहीच दिवसांपुर्वी जामीनावर सुटून तुरुंगातून बाहेर आला. एल्विश यादव चर्चेत असतानाच तो बुधवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचा आशीर्वाद घेताना दिसला. कुप्रसिद्ध साप विष प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर एल्विशने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. एल्विशचा सहकुटुंब फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

एल्विशने बुधवारी रात्री उशिरा त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट केले. फोटोत दिसतं की एल्विश सिद्धिविनायकाच्या चरणी आशिर्वाद घेताना दिसला. त्याच्यासोबत राघव शर्मा आणि लवकेश कटारिया हे मित्र होते. त्याच वेळी एल्विशचं संपूर्ण कुटुंबही फोटोत दिसलं. पोज देतानाचा फोटो शेअर करत एल्विशने 'माय बॅकबोन' असं लिहीलेलं दिसलं. 

17 मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी सापाच्या विष प्रकरणात ताब्यात घेतलं. एल्विशच्या सहभागाबद्दल पुरावे सापडल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी एल्विशला तुरुंगवास सुनावला. एल्विशच्या प्रकरणाला यापुढे कोणतं वळण मिळणार,  याची उत्सुकता आहे.

टॅग्स :बिग बॉस