एकता कपूर संतापली! पुन्हा शूट झाला ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’चा सेक्स सीन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 15:32 IST
एकता कपूरची वेबसीरिज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ सध्या यातील हॉट सीन्समुळे चर्चेत आहे. पण अलीकडे या वेबसीरिजचा एक हॉट सीन ...
एकता कपूर संतापली! पुन्हा शूट झाला ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’चा सेक्स सीन!
एकता कपूरची वेबसीरिज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ सध्या यातील हॉट सीन्समुळे चर्चेत आहे. पण अलीकडे या वेबसीरिजचा एक हॉट सीन लीक झाला आणि एकता कपूर जाम संतापली. वेबसीरिजची लीड अॅक्ट्रेस करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता यांच्यामधील हा लव्ह मेकिंग सीन होता. हा हॉट लव्ह मेकिंग सीन लीक झाला आणि सगळाच घोळ झाला. कारण, व्हायरल झालेला हा सीन वेबसीरिजमध्ये दाखवणे एकताच्या मनाला पटणारे नव्हते. मग काय, हा सीन पुन्हा एकदा म्हणजेच नव्याने शूट करण्याचे फर्मान एकताने सोडले आणि त्यानुसार अलीकडे या सीनचे रिशूट झाले. हा सीन इतका हॉट होता की, याच्या शूटींगवेळी केवळ फिमेल क्रू तेवढाच सेटवर होता. करिश्मा व सिद्धार्थने अधिकाधिक कम्फर्टेबल राहून हा सीन द्यावा, हा यामागचा उद्देश होता. यावेळी मोबाईल फोनही सेटवर बॅन करण्यात आल्याचे कळते. खरे तर केन घोष ही सगळी वेबसीरिज दिग्दर्शित करतो आहे. पण या लव्ह मेकिंग सीनच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सहाय्यक महिला दिग्दर्शकाकडे सोपवण्यात आली होती. स्वत: केनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीक्वेंस शूट करण्याआधी आम्ही बरीच रिहर्सल केली. सर्व मुलींना कम्फर्टेबल होती, याकडे आमचे लक्ष होते. तूर्तास ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ चा सेक्स सीन लीक करणाºया व्यक्तिचा शोध घेतला जात आहे. बालाजीची लिगल टीम याकामी लागली आहे. एकंदर काय तर एकता या वेबसीरिजच्या बाबतीत कुठलीही तडजोड करायला तयार नाही, हेच यावरून दिसतेय. ALSO READ : सेक्स अन् थरार...! पाहा; ‘रागिनी एमएमएस रिटर्न’चा ट्रेलर!! ही वेबसीरिज दोन कॉलेज गर्ल्सची कहानी असल्याचे कळते. दोघीही एका होस्टेलमध्ये राहतात. याच होस्टेलमध्ये एक म्हातारी चेटकीण असते आणि होस्टेलच्या मुलींना त्रास देतांना दिसते. यात करिश्मा शर्मा रागिणीची भूमिका साकारते आहे तर रिया सेन सिमरनच्या व्यक्तिरेखेत आहे. दोघीही या वेबसीरिजमध्ये अतिशय बोल्ड भूमिकेत आहेत.