Join us

एकता कपूरला इंडस्ट्रीमधील लोक घाबरतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 18:28 IST

उडता पंजाब या चित्रपटाला इंडस्ट्रीतील सगळेच लोक पाठिंबा दर्शवत आहेत. या चित्रपटाच्या मागे एकता कपूर, अनुराग कश्यप यांसारखी इंडस्ट्रीतील ...

उडता पंजाब या चित्रपटाला इंडस्ट्रीतील सगळेच लोक पाठिंबा दर्शवत आहेत. या चित्रपटाच्या मागे एकता कपूर, अनुराग कश्यप यांसारखी इंडस्ट्रीतील मोठी नावे असल्याने या चित्रपटाला विरोध होत नसल्याचे धी पंजाब दी या पंजाबी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते बलजीत सिंग यांचे म्हणणे आहे. एकता कपूरच्या विरोधात गेल्यास एकता आपले करियर खराब करेल अशी भीती असल्याने सगळे या चित्रपटाला पाठिंबा देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंजाब या राज्याचा या चित्रपटात अपमान केला असून या चित्रपटातील शाहिद कपूरच्या व्यक्तिरेखेची भाषा ही प्रचंड असभ्य आहे. यामुळे या चित्रपटाविरोधात मी आंदोलन करणार असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. अनुराग आणि एकता यांनी पंबाजवासियांची माफी मागावी. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी या चित्रपटाविरोधात कडक कारवाई करावी असेही त्यांचे म्हटले आहे. काहीही झाले तरी हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.