Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव तेरा भानगडी’ मधील करामती चतुर भावड्याचे झाले लग्न, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:41 IST

‘एक गाव तेरा भानगडी’ ही युट्यूबवरची वेबसीरिज चांगलीच गाजली आणि गाजतेय.  गावातील मजेदार किस्से, गमतीजमती  यामुळे ही वेबसीरिज अल्पावधीत ...

ठळक मुद्देचतुर यांचे संपूर्ण नाव बाळासाहेब सुनील पाटील असे आहे. तो मुळचा सांगलीचा.

‘एक गाव तेरा भानगडी’ ही युट्यूबवरची वेबसीरिज चांगलीच गाजली आणि गाजतेय.  गावातील मजेदार किस्से, गमतीजमती  यामुळे ही वेबसीरिज अल्पावधीत लोकप्रिय झाली. या वेबसीरिजमधील सर्वात गाजलेले पात्र म्हणजे चतुर भावड्या. आज चतुर भावड्या म्हटलं की, त्याचा लहान मूर्ती डोळ्यांपुढे येते. अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे चाहते आहेत. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशा याच चतुर भावड्याचे आता दोनाचे चार हात झाले आहेत.

होय, नुकताच चतुर लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचा सुंदर व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.   सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही प्रेक्षक चतुर यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत. चतुर यांचे संपूर्ण नाव बाळासाहेब सुनील पाटील असे आहे. तो मुळचा सांगलीचा. सांगलीच्या विटा येथे त्याचं शिक्षण पूर्ण झालं. एम कॉमपर्यंत शिकलेल्या चतुर याचे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे.  एक गाव तेरा भानगडीत चतुरची खोडकर भूमिका चांगलीच गाजली आणि तो तरूणाईत चतुर भावड्या याच नावाने ओळखला जाऊ लागला.

टॅग्स :यु ट्यूब