Join us

आता मुलं-मुली पुन्हा थिएटरमध्ये रडणार! हर्षवर्धन राणेच्या ‘एक दिवाने की दिवानियत’चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:39 IST

‘एक दिवाने की दिवानियत’ सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. सैयारा सारखीच या सिनेमाची अत्यंत भावनिक कथा आहे

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी थिएटरमध्ये गर्दी केली. याशिवाय अनेकांच्या डोळ्यातून पाणी येऊन ते थिएटरमध्ये ढसाढसा रडताना दिसले. अशातच प्रेमी युगुलांना रडवणारा आणखी एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘एक दिवाने की दिवानियत’. नुकतंच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा आगामी चित्रपट ‘एक दिवाने की दिवानियत’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात एक भावनिक प्रेमकथा आहे. टीझरमध्ये प्रेम, वेड आणि विश्वासघात यांसारख्या भावनांचा संगम पाहायला मिळतो. ज्यामुळे चित्रपटात अनेक नाट्यमय वळणं बघायला मिळणार आहे.

 या टीझरमध्ये हर्षवर्धन राणे एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची आठवण झाली आहे. टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रेक्षक या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केले आहे, जे ‘सत्यमेव जयते’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटाची कथा मुश्ताक शेख यांनी लिहिली आहे. प्ले डीएमएफचे अंशुल गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘एक दिवाने की दिवानियत’ हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :हर्षवर्धन राणेबॉलिवूडटिव्ही कलाकारटेलिव्हिजन