Join us

बॉलिवुडला दरवर्षी मिळते प्रेक्षकांकडून ईदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 11:40 IST

प्राजक्ता चिटणीससलमान खानचा सुलतान हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. याआधीही सलमानचे वाँटेड, दबंग, किक, बॉडीगार्ड, एक ...

प्राजक्ता चिटणीससलमान खानचा सुलतान हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. याआधीही सलमानचे वाँटेड, दबंग, किक, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान यांसारखे चित्रपट ईदलाच प्रदर्शित झाले होते. ईदला बिग बजेट आणि चांगली स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड हा काही बॉलिवुडमध्ये आताच रूजू झालेला नाही. नव्वदीच्या दशकापासूनच आपल्याला हा ट्रेंड पाहायला मिळतो. पण पूर्वी ईदला चित्रपट प्रदर्शित झाले तरी ते हिट होतीलच असे नव्हते. पण मल्टीपलेक्सच्या आगमानानंतर ही परिस्थिती खूप बदललेली आहे. 2005 पर्यंत मल्टीप्लेक्सचे चांगलेच पेव आपल्याकडे फुटलेले होते. त्यामुळे त्यानंतरच्या ईदला प्रदर्शित झाल्यापैकी अनेक चित्रपट हे हिट ठरले आहे. 1991पासून ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे आणि त्यांच्या व्यवसायाकडे एक नजर टाकूया...1991 - अजूबा - फ्लॉप 1991 - अफसाना प्यार का - फ्लॉप1992 - बेटा - ब्लॉकबस्टर हिट1993 - क्षत्रिय -फ्लॉप1993 - अनारी - हिट1994- लाडला - सुपरहिट 1995 -  सुरक्षा - फ्लॉप1995 - पांडव - फ्लॉप1995 - नाजायज - अॅव्हरेज1997 - जुडवा - हिट1997 - यशवंत - सेमी हिट1998 - विनाशक - फ्लॉप1998 - हफ्ता वसुली - फ्लॉप1999 - हम आपके दिल में रहते है - सुपर हिट 1999 - आ अब लोट चले - अॅव्हरेज2000 - मेला -  फ्लॉप2000 - खिलाडी 420 -  फ्लॉप2001 - कभी खुशी कभी गम  - ऑल टाईम ब्लॉकबस्टर2002 - कर्ज -  फ्लॉप2003 - कल हो ना हो - हिट2004 - वीर झारा - सुपरहिट2004 - ऐतराज - अॅव्हरेज2005 - गरम मसाला - हिट2005 - क्योंकी -  फ्लॉप2006 - डॉन - हिट 2006 - जान - ए - मन -  फ्लॉप2007 - भूल भूलैय्या - हिट 2007 - लागा चुनरी मैं डाग -  फ्लॉप2008 - किडमॅप -  फ्लॉप2008 - द्रोणा -  फ्लॉप2009 - वाँटेड - हिट 2009 - दिल बोले हडिप्पा -  फ्लॉप 2010 - दबंग - ब्लॉकबस्टर2011 - बॉडीगार्ड - ब्लॉकबस्टर2012 - एक था टायगर - ब्लॉकबस्टर2013 - चेन्नई एक्सप्रेस - ब्लॉकबस्टर2014 - किक - ब्लॉकबस्टर2015 - बजरंगी भाईजान - ऑल टाईम ब्लॉकबस्टर
या सगळ्या चित्रपटांच्या व्यवसायाकडे आपण पाहिल्यास एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. 2005 सालच्या आधी ईदच्या दिवशी प्रदर्शित होईनही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारे खूपच कमी चित्रपट आहेत. कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, वीर झारा, गरम मसाला, डॉन, भुलभूलैय्या असे  या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट हिट ठरले. पण 2009 च्या ईदनंतर ईद ही केवळ सलमानच्या चित्रपटांसाठी राखीव असलेली आपल्याला पाहायला मिळाली. वाँटेडनंतर प्रत्येक ईदला आलेल्या सलमानच्या चित्रपटाने तिकिटबारीवर प्रचंड कमाई केली. केवळ 2013ला शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेदेखील रेकॉर्डतोड कमाई केली. त्यामुळे 2009 नंतरची प्रत्येकच ईद बॉक्स ऑफिसच्या लोकांसाठी खूपच लकी ठरली. यावर्षी ईदला प्रदर्शित झालेल्या सुलतान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 कोटीहून अधिक गल्ला जमवला. आज सलमान ईदचा बादशहा मानला जात असला तरी सलमाननेही याआधी ईदला अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 
ईद, दिवाळी, ख्रिसमस या सणांना आपल्या कुटुंबासमवेत अथवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला जाणाऱ्या लोकांची संख्या ही खूप असते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे निर्मात्यांसाठी फायदेशीर असते. अनेक निर्माते कित्येक महिने आधीच ही तारीख ठरवतात.
 
 
तीन सण, तीन खानांच्या नावावर
गेल्या 10 वर्षांत आपल्याकडे मल्टीप्लेक्सची संख्या वाढली आहे. येथील तिकिटदर हे खूप जास्त असतात. तसेच एकाच दिवसात अनेक शो या मल्टीप्लेक्समध्ये दाखवले जातात. सणाच्या दिवशी लोक आवर्जून चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला की, या मल्टीप्लेक्सच्या दरांमुळे पहिल्या तीनच दिवसांत चित्रपटाची करोडोची कमाई होते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आज सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तीन खानांचा बॉलिवुडवर दबदबा आहे. त्या तिघांपैकी कोणत्याही दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर एकाच्या चित्रपटाला फटका बसतो. त्यामुळे या तिघांनी प्रत्येक सण वाटून घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सण म्हटला की, दोन दिवस तरी सुट्टी असते. त्यामुळे या दोन-तीन दिवसांत चित्रपटचा व्यवसाय चांगला होतो. सलमानचे चित्रपट ईदला, शाहरुखचे दिवाळीत आणि आमिरचे चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होत असल्याचे आपल्याला गेल्या 6-7 वर्षांत पाहायला मिळत आहे. या तिघांसमोर कोणत्या इतर अभिनेत्याचा चित्रपट तग धरू शकत नाही हे बॉलिवुडमधील मंडळींना चांगलेच माहीत असल्याने निर्मातेही त्यांच्यासोबत चित्रपट प्रदर्शित करणे टाळतात. आपल्या बॉलिवुडच्या चित्रपटांचा विचार केला तर वर्षाच्या मध्यानंतर आलेले चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर अधिक चांगली कमाई करतात असेच आपल्याला पाहायला मिळते. आणि हे तिन्ही सण हे याच दरम्यानच येत असल्याने त्याचा फायदाही चित्रपटांना नक्कीच होतो. 
- एन.पी. यादव, ट्रेड अॅनालिस्ट