भाईजान सलमान खानच्या घरी अशी उत्साहात साजरी झाली ईद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 10:26 IST
भाईजान सलमान खान याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये काल ईद उत्साहात साजरी झाली. भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शेकडो चाहते गॅलॅक्सीबाहेर जमले ...
भाईजान सलमान खानच्या घरी अशी उत्साहात साजरी झाली ईद!
भाईजान सलमान खान याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये काल ईद उत्साहात साजरी झाली. भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शेकडो चाहते गॅलॅक्सीबाहेर जमले होते. काही वेळाने भाईजान बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांना अभिवादन केले. यावेळी सलमान ब्ल्यू कलरच्या स्वेटशर्टमध्ये दिसला. सलमानच्या कुटुंबासाठी ईदचा दिवस खूप खास असतो. या दिवशी बॉलिवूडमधील अनेकजण खान कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी सलमानच्या घरी पोहोचतात. याही वर्षी अनेक सेलिब्रिटींनी सलमान व खान कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. यात प्रिती झिंटा, दीया मिर्झा, जॅकलिन फर्नांडिस, मलायका अरोरा, अमृता अरोरा, मनीष पॉल असे सगळे दिसले. सलमानची कथित प्रेयसी युलिया वेंटर ही सुद्धा यावेळी पोहोचली. या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सलमानची बेस्ट फ्रेन्ड प्रिती झिंटा हिने युलिया व सल्लूची बहीण अलविरा खान हिच्यासोबत सेल्फी घेतली. मलायका अरोरा एक्स हसबण्ड अरबाज खानसोबत एन्जॉय करताना दिसली. एकंदर काय तर सलमानच्या घरी काल धम्माल मस्ती झाली. सेलिब्रेशन झाले. गत शुक्रवारी सलमानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. गत तीन दिवसांत या चित्रपटाने ६४ कोटी रूपयांचा बिझनेस केला. सलमानच्या यापूर्वीच्या चित्रपटांशी तुलना केल्यास हा आकडा तसा फारच कमी आहे.‘ट्यूबलाईट’ने शुक्रवारी २१.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई २१.१७ कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास २२ कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ने रिलीजनंतरच्या तीन दिवसात सुमारे ६४ कोटी कमावले. प्रत्यक्षात या सिनेमाकडून यापेक्षा कितीतरी जास्त अपेक्षा होत्या. इतक्या की,‘ट्यूबलाईट’ कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली2’ला मागे टाकेल असेही ठोकताळे बांधले जात होते. पण चित्र वेगळेच आहे. ‘ट्यूबलाईट’ हा कमाईच्या बाबतीत बाहुबलीच्या जवळपासही नसल्याचे दिसतेय. ‘बाहुबली 2’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच आठवड्यात १२८ कोटी रुपये कमावले होते.