सोशल मीडियाच्या दुनियेत एखादी गोष्ट कधी व्हायरल होईल हे कोणालाच कळत नाही. गेल्या वर्षी एका पाकिस्तानी गायकाचं गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. ते गायक म्हणजे चाहत फतेह अली खान (Chahat Fateh Ali Khan ). चाहत फतेह अली खान यांचं 'बदो बदी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यावर अनेक रील्स आले. पण, नंतर युट्युबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे गाणं डिलीट केलं होतं. या गाण्याला तब्बल २८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. हे गाणं डिलीट झाल्यानंतर गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले होते. आता पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान हे पुन्हा चर्चेत आहे. लंडनमध्ये त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली.
चाहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसतंय की जेव्हा चाहत फतेह अली खान हे चाहत्यांसोबत फोटो काढत होते, त्याचवेळी एका व्यक्तीने धावत येत त्याच्या डोक्यावर चक्क अंडे फोडले आणि तो पळून गेला. ही घटना इतकी अनपेक्षित होती की, चाहत फतेह अली खान क्षणभर स्तब्ध होऊन पाहतच राहिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चाहत फतेह अली खान याचे खरे नाव काशिफ राणा आहे. ते एक पाकिस्तानी गायक आहेत. संगीत क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी नुसरत फतेह अली खानच्या नावावरून प्रेरणा घेऊन आपले नाव बदलले. कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान ते फेसबुक लाईव्हद्वारे खूप प्रसिद्ध झाले होते. त्याच्या गाण्यांवरील रील्स आणि मीम्समुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. ते पाकिस्तानी टीव्ही शोमध्येही पाहायला मिळतात.