Join us

​‘बॉलिवूडचा बादशाह’ टीव्हीवर परतण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 20:38 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याने आपले नेक्स टारगेट ठरविले आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याने आपले नेक्स टारगेट ठरविले आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अ‍ॅक्टिंग करीअरला सुरुवात करणार शाहरुख खान आता पुन्हा एकदा त्याच माध्यमाकडे सक्रिय होण्यासाठी हालचाल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानचे मागील काही चित्रपट पाहता तो काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसतेय. याच मालिकेतील त्याचा डीअर जिंदगी व रईस हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरल्याने त्याच्या आत्मविश्वासाला नवे बळ मिळाले आहे. याचमुळे त्याने आता टीव्ही शो होस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शाहरुखने तयारी चालविली आहे. लवकरच शाहरुख खान टीव्हीवर दिसेल अशी माहिती मिळतेय. शाहरुखच्या आगामी टीव्ही शोची लाँचिग डेट अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी देखील त्याने आगामी शोच्या शूटिंगला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानच्या आगामी शोचा कॉन्सेप्ट एका लोकप्रिय व्हिडिओ सिरीजवर आधारित आहे. याबद्दल शाहरुखने मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम समाजात होणाºया बदलांच्या कथा दाखविण्यात येणार आहे. यात आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तिकरण, पर्यावरण यासारख्या विषयांचा समावेश असेल. असेही सांगण्यात येते की एका एपिसोडच्या शूटिंगनंतर या कार्यक्रमाची टीम संपूर्ण रिव्हू घेईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रोडक्शन टीमने हा दावा केला आहे की, असा शो अद्याप टीव्हीवर आलेला नाही. यामुळे संपूर्ण टीम उत्साहाने काम करीत आहे. लहान पडद्यापासून सुरुवात करणाºया शाहरुखने बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दरम्यान त्याने ‘कौन बनेगा करोडपती’ व ‘क्या आप पाचवी पास से तेज ह’ै यासारखे शो होस्ट केले आहेत.