Join us

​ड्वेन जॉन्सनचा गेला तोल, सगळ्यांसमोर प्रियांका चोप्रासोबत केले भलतेच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 11:27 IST

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या ‘बेवॉच’ या तिच्या आगामी हॉलिवूडपटामुुळे चांगलीच चर्चेत आली आहे.गत शनिवारी ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाचे शानदार प्रीमिअर पाड पडले. याचदरम्यान असे काही घडले की, पाहणारे सगळेच अवाक झालेत. होय, प्रियांकाचा को-स्टार ड्वेन जॉन्सन मागून आला आणि प्रियांका मीडियासोबत बोलत असताना अचानक तिच्या गालावर किस करून निघून गेला.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या ‘बेवॉच’ या तिच्या आगामी हॉलिवूडपटामुुळे चांगलीच चर्चेत आली आहे. प्रियांकाचा पहिलावहिला हॉलिवूडपट लवकरच रिलीज होतो आहे. गत शनिवारी या चित्रपटाचे शानदार प्रीमिअर पाड पडले. या प्रीमिअरमध्ये हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट प्रियांकांचा चांगलाच जलवा दिसून आला. मीडिया अक्षरश: प्रियांकाच्या प्रेमात जणू वेडा झाला होता. मीडियाचे सगळे कॅमेरे प्रियांकावर टिकले होते आणि प्रियांका त्यांना एकापेक्षा एक चांगल्या अशा पोज देत होती. पण प्रियांका मीडियाला इंटरव्ह्यू देण्यासाठी पुढे आली आणि याचदरम्यान असे काही घडले की, पाहणारे सगळेच अवाक झालेत. होय, प्रियांकाचा को-स्टार ड्वेन जॉन्सन मागून आला आणि प्रियांका मीडियासोबत बोलत असताना अचानक तिच्या गालावर किस करून निघून गेला. एक क्षण काय घडले, हे प्रियांकालाही कळले नाही. पण प्रियांका तर शेवटी प्रियांकाच आहे. तिने ही स्थिती अतिशय शिताफीने सांभाळून घेतली. ड्वेन जॉन्सनचा किस अतिशय स्पोर्टली घेत, ती पुन्हा मीडियाकडे वळली. अर्थात हा सगळा सीन कॅमेºयात कैद झाला. मग काय प्रियांकानेही हा सीन तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलाय. सध्या ‘बेवॉच’च्या प्रीमिअरमधील प्रियांकाचे फोटो आणि तिचा हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. मियामीमध्ये झालेल्या या प्रीमिअरमध्ये प्रियांका अतिशय ग्लॅमरस दिसतेय. या प्रीमिअरमध्ये प्रियांका डार्क ब्लू शिमरी गाऊन घालून पोहोचली.   टाईट पोनी टेल, ब्ल्यू कलरची आय शॅडो, डार्क पिंक लिपस्टिक याने तर तिचे सौंदर्य आणखीच खुलले. ‘बेवॉच’ या चित्रपटात ड्वेन जॉन्सन, जॅक अफ्रॉन मुख्य भूमिकेत आहेत.