मज्जा आहे बुवा दीपूची!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 10:57 IST
सध्या बॉलिवूडमध्ये बिझी असलेली दीपिका पदुकोणला हॉलिवूडमधून आणखी काही आॅफर्स मिळाल्याची खबर असताना, बॉलिवूडमधील दिग्दर्शकही दीपूच्या प्रतीक्षेत आस लावून ...
मज्जा आहे बुवा दीपूची!!!
सध्या बॉलिवूडमध्ये बिझी असलेली दीपिका पदुकोणला हॉलिवूडमधून आणखी काही आॅफर्स मिळाल्याची खबर असताना, बॉलिवूडमधील दिग्दर्शकही दीपूच्या प्रतीक्षेत आस लावून बसले आहेत. प्रत्यक्षात मात्र दीपूला हॉलिवूडच्या आणखी काही बड्या आॅफर्स मिळाल्याचे वृत्त आहे. असे असेल तर निश्चित बॉलिवूडमधील दीपूची वापसी लांबणार आहे. यशराज बॅनर्ससह दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि होमी अदजानिया यांना दीपिकाची प्रतीक्षा आहे. या तिघांनीही दीपिकाला चित्रपटांची आॅफर दिली होती.मात्र त्यावेळी दीपू ‘बाजीराव मस्तानी’मध्ये व्यस्त होती. ‘बाजीराव’ नंतर काही दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर ती या चित्रपटांचे चित्रीकरण सुरु करेल, असे त्यावेळी ठरले होते. त्यातही राघवन व होमी यांचे चित्रपट दीपू आधी हातात घेणार होती. मात्र असे न होता विन डीझलसोबतच्या हॉलिवूडपटासाठी दीपिका विदेशात रवाना झाली. त्यामुळे यशराजसह राघवन व होमी या तिघांनीही आपले प्रोजेक्ट होल्डवर टाकले आहेत. अहो, का? काय विचारता या तिघांनाही आपल्या चित्रपटात फक्त आणि फक्त दीपिकाच हवी आहे. एकंदरच दीपिकाचे भाव सध्या चांगलेच वधारले आहेत. मग काय, मज्जा आहे बुवा दीपूची!!!