आयपीएल दरम्यान नाही तर यादिवशी रिलीज होणार 'दत्त'चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:09 IST
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकची वाट त्याचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती 24 एप्रिलला ...
आयपीएल दरम्यान नाही तर यादिवशी रिलीज होणार 'दत्त'चा ट्रेलर
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकची वाट त्याचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती 24 एप्रिलला रोजी आयपीएल मॅच दरम्यान या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात येणार आहे.रिपोर्टसनुसार टीझर त्याच चॉनलवर लाँच होणार ज्यावर आयपीएल मॅच सुरु आहे. मात्र नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, ही गोष्ट केवल अफवा असल्याचे सांगण्यात येते आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणीने कन्फर्म केले आहे की हा टीझर 24 एप्रिलला संध्याकाळी नाही तर सकाळी रिलीज करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी आयपीएल मॅच दरम्यानदेखील दाखवण्यात येणार आहे. अजून याबाबत काही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ALSO READ : 'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकारसंजय दत्तच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. हा चित्रपट ‘दत्त’ या नावाने प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाच्या सेटवरून संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे जेवढे फोटो समोर आले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये तो खूपच इम्प्रेसिंग दिसत आहे. कारण रणबीर संजूबाबाच्या लूकमध्ये हुबेहूब बघावयास मिळत असल्याने प्रेक्षक त्याला आतापासूनच संजूबाबा असे म्हणताना दिसत आहेत. हा चित्रपट यावर्षाच्या मोस्ट अवेटेड श्रेणीमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता असेल यात शंका नाही. बायोपिकमध्ये रणबीर कपूर तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. हि भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत.त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल.