बॉलिवूड चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान(Farah Khan)ने अलिकडेच अभिनेत्री अलाया एफ (Alaya F) आणि तिची आई पूजा बेदी (Pooja Bedi) यांना तिच्या यूट्यूब चॅनेलवर पाहुण्या म्हणून आमंत्रित केले होते. जेव्हा अलाया तिचे आवडते ब्लूबेरी प्रोटीन पॅनकेक्स बनवत होती, तेव्हा फराह आणि पूजाने १९९२ च्या क्लासिक चित्रपट 'जो जीता वही सिकंदर'च्या आठवणी सांगितल्या आणि या दरम्यान फराहने अलायाच्या आईबद्दल काही इंटरेस्टिंग किस्से सांगितले.
फराहने खुलासा केला की, 'पहला नशा' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पूजा बेदी एका कारवर एका सीनसाठी उभी होती, पण कारखाली उभा असलेला एक स्पॉट बॉय बेशुद्ध पडल्याने परिस्थिती अचानक बदलली. फराहने अलायाला विनोदाने म्हटले, "तुला कथा माहित आहे ना? जेव्हा ती त्या कारवर उभी होती, तेव्हा तिच्या मागे नसून तिच्या खाली असलेला स्पॉट बॉय खाली पडला. मी पहिल्यांदाच थाँग्स पाहिले. त्या काळात ते फारसे सामान्य नव्हते." पूजाने लगेच स्पष्ट केले की फराह थोडे वाढवून चढवून सांगते आहे.
सगळेच हसले होते सेटवरपूजा बेदी ते गाणे आठवून सांगितले की, ते गाणे तिच्यासाठी खूप कठीण होते. 'स्पॉट बॉयला पंखा घेऊन माझा लाल स्कर्ट हवेत उडवायचा होता. त्यात मला मध्येच नाचायचे होते त्यात मी नाचू की स्कर्ट धरून उभे राहू. कारण त्यावेळी माझे कपडे उडत होते. सेटवर सगळे हसत होते. त्यावेळी माझ्या मागे एक स्पॉट बॉय उभा होता. मी थोंग घातली होती. खरेतर स्पॉटबॉय थोडा दूर उभा होता आणि त्याने सांगितले की जेव्हा जेव्हा ती समोरून तिचा ड्रेस खाली खेचण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो मागून वर उडत होतो, ज्यामुळे सेटवर खूप गोंधळ उडाला होता.
फराहने पूजाला म्हटलं वाईट डान्सरफराहने चित्रपटात पूजाला तिच्या डान्स मुव्ह्जसाठी मदत करण्यासाठी बराच वेळ घालवला होता, तिने तिच्या नृत्य कौशल्याबद्दलही विनोद केला. अलायाने मान्य केले की, ती चांगली नृत्यांगना नाही. फराह हसली आणि म्हणाली की अलायाच्या सुरुवातीच्या डान्स मुव्ह्ज तिला 'नाम है मेरा फोन्सेका' या गाण्यातील पूजाच्या सादरीकरणाची आठवण करून देतात.