Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका शोदरम्यान तापसी पन्नूच्या सर्वात मोठ्या रहस्याचा झाला उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 19:43 IST

तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘दिल जंगली’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी ती एका शोमध्ये पोहोचली असता तिच्या एका मोठ्या रहस्याचा उलगडा केला गेला.

आगामी ‘दिल जंगली’ या चित्रपटात बघावयास मिळणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी ती टीव्हीवरील अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावत आहे. एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेलेल्या तापसीला त्याठिकाणी एक असा सहकारी मिळाला, ज्याने तिच्या आयुष्याशी संबंधित एका सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा केला. त्याचे झाले असे की, तापसी ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिला अंश नावाचा एक स्पर्धक भेटला. अंश तापसीचा डान्स क्लबमधील एकेकाळचा सहकारी होता. अंशने बोलता बोलता तापसीच्या अशा काही रहस्यांचा उलगडा केला, ज्यामुळे तिची बोलतीच बंद झाली होती. तापसी अंशसोबतच्या गेल्या दिवसांचे स्मरण करीत होती, त्याचदरम्यान तिने सांगितले की, अंश आणि मी जेव्हा-जेव्हा भेटत होतो तेव्हा-तेव्हा एकमेकांशी वाद घालत होतो. तापसीचे हे वाक्य संपत नाही, तोच अंशने म्हटले की ही नेहमीच डान्सची निवड स्वत: करीत होती अन् खूप बॉसी (हुकूम गाजविणे) होती. अंशचा हा खुलासा ऐकून तापसीची बोलती बंद झाली. तापसीला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. शिवाय उपस्थितानाही तापसीच्या या स्वभावाने धक्का बसला. दरम्यान, ‘दिल जंगली’ या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त विद्युत जामवाल आणि साकिब सलम कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एका संवादामुळे चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला आहे. या संवादामुळे ललिता पवार यांचा उल्लेख ‘कानी’ असा केला आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्यास विरोध केला आहे. शिवाय सेन्सॉरने याविषयी कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे हा वाद क्षमणार की पेटणार हे लवकरच स्पष्ट होईल.