Join us

TikTokवर सापडला सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट, त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:38 IST

टिक टॉकवर सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट सध्या चर्चेत आला आहे. हा व्यक्ती हुबेहूब सुशांतसारखा दिसतो. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्ताने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांसोबत राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. या दरम्यान टिकटॉकवर सुशांतसारखा दिसणार एक व्यक्ती चर्चेत आला आहे. त्याचे नाव आहे Saqqy Padaya. त्याचा चेहरा सुशांत सिंग राजपूतशी मिळताजुळता आहे. त्याचा टिकटॉकवर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

सैकीने टिकटॉकवर सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली देणारा एक व्हिडिओ बनवला होता. ज्यात तो त्याच्यासारखा चालताना दिसत आहे आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, रेस्ट इन पीस माय आयडल. त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. त्याला लोक बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायला सांगत आहेत.

https://www.tiktok.com/@saqqy_padaya1/video/6838176263610371330

टिकटॉकवर या व्हिडिओला आतापर्यंत 7.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सोबत 3 लाखांहून जास्त लाईक्स व दोन हजारांहून जास्त कमेंट्स आल्या आहेत. 

सैफीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे आणि लिहिले की, नमस्ते मित्रांनो, मला कळत नाही कुठून सुरू करू पण तुम्हा सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत. मी टिकटॉकवर माझा आदर्श कलाकार सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. माझ्या या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. खूप प्रेम दिले. तासाभरात हा व्हिडिओ व्हायरल झाला. हे फक्त माझा आदर्श सुशांत सिंग राजपूत सर व तुमच्या सगळ्यांमुळे झाले आहे. मला इतके प्रेम देण्यासाठी धन्यवाद. 

सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तो फक्त 34 वर्षांचा होता. त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळाल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने काय पोछे, ब्योमकेश बख्शी, एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि छिछोरे या चित्रपटात काम केले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतटिक-टॉक